Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भलाडकी बहीण' योजनेसाठी पैसे नसतील तर..राज्यपालांचा बंगला विका - बच्चू कडूचा सरकारला...

लाडकी बहीण’ योजनेसाठी पैसे नसतील तर..राज्यपालांचा बंगला विका – बच्चू कडूचा सरकारला घरचा आहेर

प्रतिनिधी : लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका, असे वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. इतकंच नाहीतर राज्यपालांचा तब्बल ४० एकरातील बंगला विकला तर १ लाख कोटी येतील, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारलाच खोचक टोला लगावला आहे. कष्ट करणाऱ्यांसाठी देखील सरकारने एखादी चांगली योजना जाहीर करायला हवी. राज्य सरकारला एक चांगला सल्ला दिला आहे की, मुंबईत राज्यपालांचा बंगला आहे. हा बंगला ४० एकरात आहे. राज्यपालाला ४० एकरचा बंगला कशाला पाहिजे, त्यामुळे राज्यपालांचा तब्बल ४० एकरातील बंगला विकला तर १ लाख कोटी रूपये मिळतील, असे बच्चू कडू यांनी म्हटले असून सरकारला टोला लगावला आहे. तर चार ते पाच मजल्यांचा स्वतंत्र बंगला राज्यपालांना बांधून द्यावा, अशी खोचक टीकाही बच्चू कडू यांनी केली. इतकंच नाहीतर राज्यपालांसाठी असलेल्या बंगल्याची ४० एकरातील जागा विकून येणाऱ्या पैशातून कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना जाहीर करा, असंही बच्चू कडू म्हणाले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments