सातारा (अजित जगताप) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतेच्या विचारांना अनेक जण अभिवादन करतात. परंतु पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा येथील महाविद्यालयात झालेल्या एका व्याख्यानाच्या वेळी एका प्रसंगाने जिजाऊच्या प्राध्यापिका असलेल्या लेकीला वर्षभर त्रास सहन करावा लागला. अखेर न्यायालयानेच न्याय देऊन या जिजाऊच्या लेकीला संविधान व कायद्याने संरक्षण दिले.
फुले- शाहू- आंबेडकर- विचाराचा वारसा जपणारे क्रांतिकारक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी बहुजन समाजाला छत्रपती शिवाजी महाराज समजवून सांगण्यासाठी शिवाजी कोण होता? हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तका मधील उल्लेखाने प्राध्यापिका मृणालिनी आहेर यांच्या विरोधात खूप मोठे षडयंत्र रचले. एवढेच नव्हे तर स्थानिक पोलीस ठाणे ते गृहमंत्रालय अशा अनेक लोकांच्या कारवाईने त्यांना वर्षभर त्रास सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर एका पोलिस अधिकाऱ्यांनी महाविद्यालय प्रशासनाने प्रा. आहेर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे पत्र दिले. या पत्राच्या विरोधात उच्च न्यायालयातच दाद मागितल्यामुळे त्या पोलीस अधिकारी व गृह मंत्रालयाचे लक्तरे आता उच्च न्यायालयानेच निकालातून स्पष्ट केले आहे.
कॉम्रेड पानसरे यांचे शिवाजी कोण होता? हे पुस्तक व भारतीय संविधान व घटनेचे १९ (अ) वे कलम वाचन करा असाही सल्ला दिला असल्याचे समजते. महाविद्यालयाला कोणत्या अधिकाराने पत्र पाठवून आदेश देणारे तुम्ही कोण ? अशा शब्दात याबाबतही खरडपट्टी काढलेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रश्नाला आवाज उठवला आहे.
प्रा. मृणालिनी आहेर यांना एका छोट्याशा कारणावरुन वर्षभर त्रास सहन करावा लागला, त्याचा शेवट दिलासादायक झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करणार्या, खोट्या धर्माभिमानी काहींनी चक्क जिजाऊच्या एका लेकीलाच वेठीला धरलं होतं. त्यांना आता त्यांची चूक समजली असेल.
स्वत:ला शिवप्रेमी म्हणवून घेणार्यांनी एका मुद्यावर वाद सुरू केला होता. तो मिटवण्यासाठी प्रेक्षकांत बसलेल्या प्रा. मृणालिनी आहेर यांनी एक वर्षांपूर्वी मध्ये पडल्या. समजावणीच्या स्वरात त्या पोरांना म्हणाल्या “अरे, शिवरायांचे खरे विचार समजून घ्या. तुम्ही पानसरेंचं ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक वाचा.”एवढ्या शब्दावरून त्या मुलांनी प्रा. आहेर यांना अपमानित केले. “तुम्ही ‘शिवाजी कोण होता’ असा एकेरी उल्लेख केलात.. शिवरायांना अरेतुरे करता? हा छत्रपतींचा अपमान आहे. माफी मागा.” म्हणत दंगा केला.
सदर प्रकरण पोलिस ठाण्यात गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी प्राध्यापिका मृणालिनी आहेर यांच्यावर कारवाई करण्याचे व विभागीय चौकशी करण्याचे पत्र संबंधित महाविद्यालयाच्या प्रशासनाला एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते.
त्यानंतर प्राध्यापिका मृणालिनी आहेर व त्यांचे पती प्राध्यापक अजित गाढवे यांनी मुंबई उच्च न्यायालयातच दाद मागितली.
वर्षभर याबाबत सुनावणी व खटले सुरू होते. काल मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकिलांनी राज्यातील जनतेची बाजू मांडायला हवी होती. उलट अभिव्यक्ती स्वातंत्र्य गदा आणली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी महाविद्यालय प्रशासनाल दिलेले पत्र मागे घ्या. अन्यथा कारवाईला सामोरे जा. अशा शब्दात न्यायालयाने सरकारला माफीनामा लिहून देण्याची सूचना केली आहे. सदरचे प्रकरण सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात चालले आहे काय ? याची चांगली चर्चा रंगू लागलेली आहे.
प्रसिद्ध सिने अभिनेते व विचारवंत किरण माने यांनी प्राध्यापक अजित गाढवे व प्राध्यापिका मृणालिनी आहेर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी न्यायालयात लढा दिल्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करून त्यांना पेढे भरवले व संविधानाची प्रत भेट दिली आहे.
————————————-+—–
चौकट – सिने अभिनेते व विचारवंत किरण माने यांनी शब्दबद्ध केलेल्या या प्रसंगाने खऱ्या अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणाराचेच कौतुक होते. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.
साताऱ्यातील जिजाऊच्या प्राध्यापिका लेकीला न्यायालयाने दिला न्याय…
RELATED ARTICLES