1तळमावले/वार्ताहर(डॉ संदीप डाकवे) : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार स्पर्धेचे पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त लेखक आणि पुस्तकांची नावे (कंसात) पुढीलप्रमाणे: शशांक दि.देशमुख (अभिधा), गीतेश गजानन शिंदे (सीसीटीव्हीच्या गर्द छायेत), भारत सातपुते (जागरण), जयश्री कुलकर्णी अंबासकर (चिंब सुखाचे तळे), डाॅ.आदिती काळमेख (दिडदा दिडदा), सौ.रश्मी रविंद्र गुजराथी (आनंदाच्या बिया), सुभा लोंढे (तुटलेला धागा), सौ.गायत्री मुळे (वास्तुपुरुष), इंद्रजित कल्याण पाटील (शेलक्या बारा), विक्रांत शिवराम केसरकर (सुंदर माझे गांव- मु.पो.हेदूळ (वर्णन), रश्मी पदवाड-मदनकर (पद्मकोश), सौ.जयश्री अनिल पाटील (बालजगत), गोकुळ गायकवाड (ताटातूट) नोमेश नारायण (रक्तफुलांचे ताटवे), राहुल गडपाले (अवतरणार्थ) सुलभा साईनाथ सत्तुरवार (चांदण फुले) अजित काटकर (अंतिम इच्छा) विठ्ठल वडाम (एकी बेकी)
ट्रस्टच्यावतीने यापूर्वी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, गणेश-नवरात्र वार्तांकन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पुरस्कारप्राप्त लेखक, कवी यांना एका समारंभात गौरवण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे.
