ताज्या बातम्या

राष्ट्रीय कर्मचारी सेनातर्फे बाळासाहेब भवन येथे महत्वपूर्ण सभा संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर ) लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष, शिवसेना सचिव, प्रवक्ता,मा.आमदार श्री. किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक रविवारी (दि.३१) बाळासाहेब भवन येथे पार पडली.

एप्रिल महिन्यात येणारे उत्सव सण ,जयंती म्हणजेच गुढीपाडवा,आंबेडकर जयंती, हनुमान जयंती तसेच एक मे रोजी होणारा कामगार दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात साजरा करण्यात यावा असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्ष सुमंत तारीख श्रेयस पाडावे दिलीप नाईक,गणेश शेट्टी छत्रपती पुरस्कार विजेते,मा.नगरसेवक मंगेश सातमकर तसेच सर्व चिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित होते.पक्षाचे मुख्य नेते आणि मान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात लोकसभेच्या जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top