ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

वरळीत अंगावर झाड कोसळून तरुणांचा मृत्यू

मुंबई : सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वरळी बीडीडी चाळ जांभोरी मैदान येथे अमित जगताप (४५) यांच्या अंगावर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असता, त्यांना उपचारासाठी परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी ५.४० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत पावसाची हळूवार एंट्री झाल्यापासून पडझडीचे सत्र सुरूच आहे. घर अथवा घराचा भाग कोसळणे, झाड, झाडांच्या फांद्या कोसळणे अशा घटनांचे सत्र सुरूच आहे. यंदाच्या पावसांत झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी वरळीच्या जांभोरी मैदानाजवळ, बीडीडी चाळ क्रमांक १९ जवळ रस्त्याच्या बाजूला असलेले झाड सोमवारी सकाळी अचानक कोसळून तेथे असलेले अमित जगताप (४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले

Scroll to Top