ताज्या बातम्या

साताऱ्यात जात पडताळणी बाबत विरोधक पराभूत… सत्ताधारी विजयी झाल्याची चर्चा…

सातारा(अजित जगताप) : जात नाही ती जात… तीच जात कधी कधी विना आंदोलनाचे राजकीय फायद्यासाठी जात दाखल्याची गरज भासते. या जातीची पडताळणी करताना सातारा जिल्ह्यात इतर मागासवर्गीय प्रवर्गातील कुणबी मराठा जातीचा दाखला विरोधी पक्षातील सदस्याचा अवैद्य व सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधीचा जातीचा दाखला वैद्य ठरत असल्याची बाब चर्चेचा विषय झालेली आहे.
जातीसाठी माती खाणारे लांब… पण, राजकीय फायद्यासाठी कुणबी मराठा जात दाखला आता भाजप प्रणित सत्ताधाऱ्यांना जवळची वाटू लागली आहे. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मूळ कुणबी मराठा असणाऱ्या अनेकांवर अन्याय झाला आहे. गेली दहा वर्षांपूर्वी ज्यांनी दाखले काढलेत त्यांच्यापेक्षाही दोन दिवसात जातीचे दाखले काढणारे कुणबी मराठा म्हणून लाभ घेत आहेत. अशा तक्रारी वाढू लागलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील डॉक्टर आंबेडकर भवन येथील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात अनेक जण हेलपाटे मारत आहेत. त्यांना अद्यापही जातीचे दाखले मिळत नाही. शैक्षणिक कामासाठी तर विलंब लागत आहे. जणू काही राजकीय फायद्यासाठीच ही समिती काम करत असल्याची टीका होऊ लागली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील सातारा जिल्हा परिषदेच्या खटाव तालुक्यातील निमसोड जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले संदीप मांडवे यांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी माण-खटाव उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. मात्र, या प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत नंदकुमार मोरे आणि ओमकार भोसले यांनी समितीकडे तक्रार दाखल केली होती. सुनावणी दरम्यान संदीप मांडवे यांना कुणबी जातीचा दावा सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करता आले नाही. सातारा जिल्ह्यातील जात पडताळणी समितीने हा दाखला अवैध घोषित केला आहे.जात पडताळणी समितीने हा अंतिम निकाल दिला. माण-खटावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना हे प्रमाणपत्र तात्काळ जप्त करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याच सातारा जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, उपायुक्त उमेश घुले आणि समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी सर्व कागदपत्रे व पुराव्यांची तपासणी करून सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजप समर्थक डॉ. प्रिया शिंदे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला आहे. अत्यंत पारदर्शक रित्या घेतलेल्या या निर्णयाबाबत अपील करण्याची ही तरतूद ठेवून नेमकं काय साध्य केले? हे गुलदस्त्यात आहे.

इतर मागासवर्गीय समाजातील तरुण वैभव गवळी आणि
जयदीपकुमार मगर, पांडूरंग भोसले आणि मनिषा फडतरे आणि अन्य दोघांनी डॉ. प्रियाताई शिंदे यांच्या कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी झाली आणि दोन्ही बाजूंनी लेखी म्हणणे व कागदपत्रे सादर केल्यानंतर समितीने संविधान दिन दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भाजप समर्थक जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे यांचा कुणबी मराठा दाखला वैद्य ठरवून जबाबदारी पार पाडली. संविधान दिनाच्या दिवशीच तक्रार केलेल्या जातीच्या दाखल्याचा निकाल सत्ताधारीच्या बाजूने लागल्याची बाब विरोधकांनी लावून धरली आहे. पत्रकार परिषदेच्या मार्फत काही आक्षेप नोंदवले आहेत.
डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या कुणबी मराठा जातीच्या दाखल्या बबतत क्रारदारांना पडताळणी समितीच्या या निर्णयाविरोधात ९० दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्याची मुभा आहे. वास्तविक पाहता कुणबी मराठा जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्र योग्यरीत्या तपासणी न केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे बंधनकारक असताना सुद्धा त्यांना क्लीन चीट दिली जाते. सत्ताधारी पक्षातील लोकांचा जातीचा दाखला वैद्य आणि विरोधी पक्षातील लोकांचा दाखला अवैद्य ही उभी फूट आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये राजकीय विरोधक पराभूत व भाजप सत्ताधारी विजयी झाल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. याबाबत आता जनतेच्या न्यायालयातच न्यायासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे बोलले जात आहे.

Scroll to Top