सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यामध्ये दोन टोलनाके असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो. विशिष्ट वाहतूक शाखेचे पोलीस तपासणी करत असतात. अशा वेळेला सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण विभागाच्य पथकाने आयशर ट्रक भरून देशी दारू पकडली. यामधील आयशर ट्रकचालक याल ताब्यात घेतले असून दोघेजण फरार झाल्याची माहिती मिळाली आहे . या कारवाईमध्ये एकूण ३४ लाख १७ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सातारा शहरामध्ये अवैध दारू वाहतूक व विक्री होत असते. ड्राय डे ला खुलेआम काही भागांमध्ये देशी-विदेशी दारू विकण्यासाठी रस्त्यावर उभे राहून सावध शोधत असतात. परंतु अशी धाडसी कारवाई अद्याप झाली नाही . तो अनुशेष सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी भरून काढला आहे. शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे यांना गोपनीय खबऱ्याने पक्की खबर देऊन काम फत्ते केले. एक आयशर ट्रक कराड बाजूकडून पुणे दिशेला अवैध विनापरवाना दारु वाहतूक होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर पेट्रोलिंग करुन सदरचे वाहन ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या.
या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदारांची दोन पथके तयार केली . एक पथक किया शोरुम, पिरवाडी समोर व दुसरे पथक वाढे फाटा या ठिकाणी नियुक्त केले होते. त्यादरम्यान ११.४० वा.चे सुमारास कराड बाजूकडून पुणे दिशेने एक आयशर ट्रक व सोबत असलेली क्रेटा वाहन हे संशयास्पदरित्या महामार्गावर जात असल्याचे दर्शनास आले. त्यांना थांबण्याचा इशारा सातारा पोलिसांनी केला असता ट्रक चालक व क्रेटा वाहन हे भरधाव वेगाने पुणे दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलीस पथकाने सदर ट्रकचा व क्रेटा गाडीचा पाठलाग केला असता क्रेटा वाहन हे भरधाव वेगाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पुणे दिशेने निघून गेले. आयशर ट्रक हा आनेवाडी पुलाखालून मर्ढे गावाकडे घेऊन जात असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस वाहने आडवे लावून दारूने भरलेल्या ट्रक मर्ढे येथे थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर सदर ट्रक मध्ये पिण्याच्या पाण्याचे बॉक्स असल्याचे ट्रक चालकाने मोठ्या धाडसाने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पथकातील पोलीस अंमलदारांनी स्वतः ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये टँगो पंचचे देशी दारूचे बॉक्स आढळून आले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेवून सातारा पोलीस ठाणेस आणून पंचनामा केला. त्यामध्ये टॅंगो पंच देशी दारूचे बॉक्स अंदाजे किंमत १५ लाख ३६ हजार रुपये व १८ लाख रुपये किंमतीचा ट्रक व ८१ हजार दोनशे रुपयेचे दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकूण मुद्देमाल जप्त केला . याबाबत सातारा शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक साो, निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक मा. सुरज गुरव, उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा श्री.विपुल पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे, सहा.पोलीस निरीक्षक श्री.सुधीर मोरे, पो.हवा. निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ.तुषार भोसले, सागर गायकवाड, मÏच्छद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, वैभव माने, राकेश सातपुते, प्रकाश रणबागले, पोलीस मित्र असिफ शेख यांनी केली आहे. या कारवाईमध्ये
आरोपी महेंद्र आनंदा डुबल वय 34 वर्षे व्यवसाय-ड्रायव्हर रा.कामठी अळी, फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे मुळ रा.शुक्रवार पेठ,कराड
जमीर हारुन पटेल रा.मलकापूर कराड, जि.सातारा मंगेश एकनाथ हरपळे रा.फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे दोन आरोपी सापडले नाहीत त्याबाबत अधिकृत माहिती पोलीस यंत्रणेकडन मिळाली नाही……
फोटो – सातारा गुन्हे प्रकटीकरण विभागाने पकडलेले देशी दारू व एक आरोपी आणि ट्रक




