ताज्या बातम्या

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात वॉटर कप स्पर्धेसाठी प्रात्यक्षिका…

सातारा(अजित जगताप ) : महाराष्ट्र मध्ये पांचट व्यवस्थापन प्रशिक्षण प्रारंभ झाला आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची ‘ ची घोषणा केली. त्याच दिवशी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कृषी विभाग व जलसंधारण विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रात्यक्षिक करून दाखवले. पावसाचे पाणी समजून चार लिटर जगातील पाणी टेबलवरील जमिनीवर टाकल्यानंतर तीन लिटर पाणी वाहून गेले त्यासोबत माती देखील होती. त्यामुळे फक्त बाष्पीकरण वगळता इतर पाणी जमिनीत मुरले. याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग यामध्ये सहभागी झाले होते.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मोकळ्या मैदानात तयार केलेल्या जमीन टेबलच्या अवतीभवती उपस्थित राहून तळमळतेने प्रात्यक्षिक दाखवले. त्यावेळी अधिकारी- कर्मचारी माहिती विचारत होते. या मध्ये जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री पवार- फरांदे व इतर अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

सातारचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या प्रशिक्षणाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन , जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे- पवार यांच्यासह कृषी व वन विभाग, उमेद, मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षक संघाने हे प्रशिक्षण घेऊन प्रात्यक्षिक दाखवले. अवधूत गुरव, सुखदेव भोसले, जितेंद्र फडतरे व अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात त्याच दिवशी पाणलोट व्यवस्थापनासाठी सज्ज झाले . यामुळे सातारा जिल्हा हा ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या’ प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे निश्चित झाले आहे. ……………………………
फोटो- सत्यमेव जयते वॉटर कपच्या साठी प्रात्यक्षिक दाखवताना अधिकारी (छाया- अजित जगताप, सातारा)

Scroll to Top