ताज्या बातम्या

मंत्री रामदास आठवले यांचे खटाव मध्ये भाजपा आ .कदम यांनी केले स्वागत…..

पुसेसावली(अजित जगताप) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे पॅंथर चळवळीतील कार्यकर्ते आहेत. भाजप सोबत त्यांच्या पक्षाची पंधरा वर्षापासून युती आहे. त्यामुळे खटाव तालुक्यातील भाजपचे विधान परिषद आमदार धैर्यशील कदम यांनी त्यांचे स्वागत केले. महायुतीतील घटक पक्ष्यांच्या नेत्यांचा सन्मान राखण्याची भूमिका भाजपचे आ. कदम हे नेहमीच करत असतात. आमदार कदम व मंत्री आठवले यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी रिपब्लिकन पक्षाने सहकार्य केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसोबत रिपब्लिकन युती केली. तेव्हापासून रिपब्लिकन पक्ष सत्तेत आहे. परंतु, रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आमदारकी किंवा महामंडळाचे सदस्य मिळाले नाही. हा भाग सोडला तर नेहमीच रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली गेली आहे. आजही भाजपचे कट्टर समर्थक असलेले काही जण रिपब्लिकन पक्षांमध्ये काम करत आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये युतीचा धर्म पाळून व्यक्तिगत पातळीवर भाजपला मदत करतात. मात्र, भाजप रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक नेते ते कार्यकर्त्यांपासून दुरावत गेले आहेत. याबाबत सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी अनेकदा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमी वर भाजपचे माझी सातारा जिल्हा अध्यक्ष व आमदार धैर्यशील कदम यांनी रिपब्लिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांचा केलेल्या सन्मान हा त्यांच्यातील मैत्रीचा दुवा आहे. रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुक्यातील सामान्य कार्यकर्ते मयूर बनसोडे यांच्याशी रिपब्लिकन नेते आठवले यांचे विशेष लक्ष असते. त्याचे पुसेसावळी नगरीत दर्शन घडले आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे नेहमीच कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. सातारा जिल्ह्यात त्यांच्या पत्रकार परिषदेला पत्रकारांपेक्षाही दालनामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते. यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत असताना २००९ च्या शिर्डी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर,व २०११ मध्ये आठवले यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची साथ सोडली.
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाले .महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि आर.पी.आय. एकत्र आल्यानंतर या आघाडीला ‘महायुती’ असे नाव मिळाले आणि त्यांनी २०१२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका एकत्र लढवल्या.
२०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीच्या पाठिंब्याने आठवले राज्यसभेवर निवडून गेले आणि जुलै २०१६ पासून ते केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या दौऱ्यानिमित्त नेहमीच स्थानिक पत्रकारांची संवाद साधून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे ताकतीने समर्थन करतात. साताऱ्यातील पत्रकार परिषदेमध्ये मी भाजपसोबत आहे असं म्हणण्यापेक्षा भाजप माझ्यासोबत आहे असं त्यांनी विनोदाने सांगितले. ते भाजपचे आमदार धैर्यशील कदम यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. मंत्री रामदास आठवले यांच्या दौऱ्याच्या वेळेला खटावचे रिपब्लिकन नेते कुणाल गडांकुश, अजित कंठे, संतोष भंडारे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Scroll to Top