धारावी, मुंबई : साप्ताहिक भगवे वादळच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता गणेश विद्या मंदिर हायस्कूल सभागृह, संत कक्कय्या मार्ग, धारावी क्रॉस रोड, धारावी, मुंबई – १७ येथे मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे यांनी ‘गणेश वंदन’ सादर केले. त्यानंतर निमंत्रित कवींनी वेगवेगळ्या रचना सादर केल्या. त्यानंतर पंकज पाडाळे यांनी “पाणी बचतीवर भारुड नृत्य” सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. ज्योती गायकवाड (आमदार – धारावी विधानसभा), डॉ. सुकृत खांडेकर (ज्येष्ठ संपादक), अमित जोशी (संपादक – दैनिक वृत्त दिनांक), रामचंद्र नागरगोजे (सहाय्यक पोलीस आयुक्त), डॉ. लक्ष्मण शिवणेकर (शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक), ना. म. शिंदे (ज्येष्ठ साहित्यिक), सौ. अर्चना अविनाश शिंदे (नगरसेविका), बाबुराव माने (माजी आमदार), निवृत्ती सावळकर (अध्यक्ष – समस्त कक्कय्या समाज महासंघ), राजेश खंदारे (सचिव संत कक्कय्या विकास संस्था )महादेव शिंदे (अध्यक्ष – वीर शैव कक्कय्या कल्याण मंडळ), शिवलिंग व्हटकर (अध्यक्ष – संत कक्कय्या विकास संस्था), रमेश कदम (ज्येष्ठ समाजसेवक), दिलीप खंदारे (अध्यक्ष – सुनिर्मल फाऊंडेशन) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर विचारमंचावरील मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. संपादक दत्ता श्रावण खंदारे यांनी आपली प्रस्तावना सादर केली. त्यांनी भगवे वादळच्या ५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. जनसामान्यांचा प्रश्न मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि समाजातील चांगल्या कार्याचा गौरव करणे, हेच भगवे वादळचे ब्रीद असल्याचे त्यांनी सांगितले.
मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवे वादळच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त “विशेष अंकाचे प्रकाशन” करण्यात आले. तसेच यावेळी समस्त कक्कय्या महासंघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सा. भगवे वादळ वृत्तपत्राचे आणि संपादक खंदारे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. साप्ताहिक भगवे वादळने गेली ५ वर्षे सामान्य माणसाचा आवाज, त्याची व्यथा आणि हिंदुत्वाचा वारसा जपत केलेल्या कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून ती समाजाला दिशा देणारी असली पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या सोहळ्यात खालील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले :
जीवन गौरव पुरस्कार – डॉ. सुकृत खांडेकर – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार, प्रभाकर तोडणकर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार, सुरेश ईश्वर पोटे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – अमित जोशी, दिपाली पारसकर, मारोती बापूराव शिकारे, डॉ. संतोष आमले, रफिक गफार घाची, जगन्नाथ तुकाराम साठे, सुधीर रामचंद्र चौधरी, आण्णासाहेब आहेर, दिलीप वामन शेडगे – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. राजन वसंत देसाई – आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. सूर्यकांत गोवळे, अनिल लक्ष्मण डोंगरे, भाऊ सावंत – प्रबोधनकार ठाकरे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.
साहित्यभूषण पुरस्कार -शब्दश्री विलास देवळेकर, लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे, विनोद नारायण विचारे, रामचंद्र नागरगोजे – आचार्य प्रल्हाद केशव अत्रे साहित्यभूषण पुरस्कार. दिलीप करकरे, अतुल लीलाधर बोरोले – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यभूषण पुरस्कार. प्रभू अग्रहारकर – संत तुकाराम महाराज साहित्यभूषण पुरस्कार. लता लीलाधर बोरोले, संतोषी संपत बांगर – कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य भूषण पुरस्कार.
समाजभूषण / समाजरत्न पुरस्कार – शशिकांत राजाराम सावंत, प्रकाश पाटकर, राजेश मासवकर, डॉ. खंडू माळवे, दिलीप गाडेकर – संत गाडगेबाबा समाजभूषण पुरस्कार. सुधिर शांताराम राणे, डॉ. सूर्यभान श्रीराम डोंगरे, ॲड. सुनिल भार्गवराम शिर्के, डॉ. दिगंबर सिताराम तायडे, सौ. संध्या रमेश वडमारे, शांताराम खामकर, निरंजन भानुमती अमृतलाल आशर, गिरीराज शेरखाने, दिलीप नारद – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार. मोहन बी. जाधव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य भूषण पुरस्कार. तानाजी एकनाथ निकम, ॲड. (डॉ.) सोपान बुडबाडकर – संत तुकाराम महाराज सामाजिक व आध्यात्मिक भूषण पुरस्कार. डॉ. रेवती आळवे – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती पुरस्कार. सौ. श्रद्धा तेंडुलकर – डॉ. प्रकाश आमटे समाजरत्न पुरस्कार. डॉ. उदय अनंत माळगांवकर – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले समाजभूषण पुरस्कार.
*शिक्षक पुरस्कार -* दिपक तुळशीराम कदम – महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार. समाधान सुभाष खैरनार – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श रात्रशाळा शिक्षक पुरस्कार. सौ. प्रभावती समाधान खैरनार – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार.
*कलाभूषण / काव्यभूषण पुरस्कार -* सौ. शकुंतला दिगंबर तायडे, एकनाथ धयाळकर, अशोक पुंडलिक नार्वेकर – कलाभूषण पुरस्कार. सौ. विमल गजरे, राजेंद्र सावंत, कल्पना म्हापूसकर, जयेश शिंदे – काव्यभूषण पुरस्कार. पंकज पाडाळे – कलाभूषण पुरस्कार.
रोखठोक पत्रमहर्षी पुरस्कार -महेश्वर तेंटाबे, शरद बनसोडे, यशवंत चव्हाण, अरुण खटावकर, अनंत बोरसे, अनंत दाभोळकर.
उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार – प्रा. नागेश हूलवळे (पसायदान), भिमराव धुळप (धगधगती मुंबई), संजय वेंगुर्लेकर (शूर सेनानी), श्याम ठक (चिरांगन), डॉ. योगेश जोशी (हॅशटॅग), भूषण तांबे (वर्तुळ), धोंडपा नंदे (गावगाथा), प्रमोद सूर्यवंशी (आम्ही मुंबईकर).
प्राणीमित्र पुरस्कार -सौ. शिला मोरे.
पुरस्कारार्थींनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून आपला पुरस्कार स्वीकारला.
या कार्यक्रमास मुंबई वृत्तपत्र लेखक संघ, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ, समस्त कक्कय्या समाज महासंघ, वीर शैव कक्कय्या कल्याण मंडळ, कक्कय्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – धारावी, झोपडपट्टी पोलीस पंचायत बिट क्र. २, सुनिर्मल फाऊंडेशन, साप्ताहिक रत्नागिरी वृत्तांत आदी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समाज बांधव यशवंत नारायणकर, उल्लेश खंदारे, गोविंद खरटमोल, सूर्यकांत इंगळे, मनोज शिंदे, नवनाथ कोकणे, शिवाजी सोनवणे, विश्वनाथ शिंदे, दिपक खंदारे, रुपचंद नारायणकर,नरसिंग कावळे उपस्थित होते.
तसेच पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी भावेश खंदारे, प्रेरणा खंदारे, पूर्वा खंदारे, मंगेश गायकवाड, परशुराम गजाकोष, शशिकांत सावंत, विलास देवळेकर, दिलीप शेडगे यांनी विशेष मेहनत घेतली.
प्रवेशद्वाराजवळ अक्षरश्री विलास देवळेकर लिखित सा. भगवे वादळ या “आद्याक्षरावर ६ फूट कविता फ्लेक्स” सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. अनेकांनी त्यासोबत फोटोही काढले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले. सुरुवातीला आणि शेवटी अल्पोपहार देण्यात आला. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम वेळेवर सुरू होऊन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल सर्वांनी आयोजकांचे कौतुक केले.




