ताज्या बातम्या

धगधगती मुंबई’ दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार!

मुंबई : साप्ताहिक भगवे वादळच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘धगधगती मुंबई’च्या दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी धारावी येथील गणेश विद्या मंदिर हायस्कूल सभागृहात हा सोहळा उत्साहात पार पडला. हा पुरस्कार धगधगती मुंबईचे उपसंपादक संतोष कदम यांनी स्वीकारला.

या कार्यक्रमाला आमदार डॉ. ज्योती गायकवाड, ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृत खांडेकर, अमित जोशी, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र नागरगोजे, डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘धगधगती मुंबई’ दिवाळी अंकाचे यंदाचे सोळावे वर्ष असून, यापूर्वीही मुंबई मराठी पत्रकार संघ, स्पंदन चारिटेबल ट्रस्ट, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ यांसह विविध स्पर्धांमध्ये या अंकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
धारावीतील साप्ताहिक भगवे वादळने ‘धगधगती मुंबई’च्या साहित्यिक व पत्रकारितेतील योगदानाची दखल घेतल्याबद्दल संपादक दत्ता खंदारे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. या पुरस्काराबद्दल धगधगती मुंबई वृत्तपत्र परिवारावर
Scroll to Top