कराड : कराड तालुक्यात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मंडप आणि डेकोरेशनच्या दरांमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘कराड तालुका मंडप असोसिएशन’ची एक महत्त्वाची बैठक हॉटेल शिवनेरी हॉटेल येथे ९ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील मंडप व्यावसायिकांनी उपस्थित राहून नवीन दरवाढीबाबत सविस्तर चर्चा केली आणि नवीन दरपत्रक निश्चित केले. हे नवीन दर १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत.
व्यावसायिकांची उपस्थिती
या बैठकीला सचिन वीर, तुळसकर, रामेश भावके, गणेश सुर्यवंशी, पांडुरंग थोरात, जयवंत थोरात, सनि पवार आणि शेखर माळी यांच्यासह कराड तालुक्यातील अधिक मंडप व्यावसायिक उपस्थित होते. सर्वांच्या संमतीने ग्राहकांसाठी आणि व्यावसायिकांच्या हितासाठी नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत.
नवीन दरपत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:
• मंडप (साइजनुसार):
• १५ × ३० : ₹३,०००
• २० × ३० : ₹६,०००
• खुर्ची (१ नग): ₹१०
• टेबल (१ नग): ₹३०
• पोल (१ नग): ₹३०
• ४ × ४ स्टेज पीस (प्रति नग): ₹१,००० (लहान) / ₹१,५०० (मोठे)
• ४ × ४ फ्लॉवर पीस (१ नग): ₹२,०००
• राजस्थानी पाळणा (१ नग): ₹३,०००
• कूलर (१ नग): ₹१,५००
• चंद्रकोर पाळणा (१ नग): ₹१,५००
• १२ इंची २ बॉक्स: ₹१,५००
• किर्तन (लहान): ₹३,५००
• लहान सभा: ₹३,५००
• भजन साऊंड: ₹२,०००
• मंडप पत्रा: ₹९,००० (२० रुपये स्क्वेअर फूट)
• कागदी मंडप: ₹३,५००
• कागदी छत: ₹५,५००
• पायाड बुडवणे: ₹१५ (स्क्वेअर फूट)
• २०० वॉट मेटल भाडे: ₹३००
• बॉक्स कमान हायवे: ₹१२,०००
• फटाके स्टॉल: ₹७,०००
• फ्लेक्स: ₹५,०००
• लाईटची लटकन: ₹३० रुपये फूट
• माती मंडप (१५ × ३०): ₹१,५००
• कार्य: ₹१,५००
• दोन्ही मिळून : ₹२,५००
सहकार्याचे आवाहन
असोसिशनच्या वतीने सांगण्यात आले आहे की, वाढत्या महागाईमुळे हा निर्णय घेणे भाग पडले असून, सर्व मंडप व्यावसायिक तसेच ग्राहक आणि नागरिकांनी या नवीन नियमांची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, अशी विनंती असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.




