ताज्या बातम्या

राज्यातील शिक्षण संस्थेच्या शुल्क बाबत होणार धोरणात्मक निर्णय…

सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात शुल्क वाढ करून शिक्षण सम्राटाने आर्थिक क्रांती केली आहे. राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण नव्हते. महायुतीने शुल्क निश्चित प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खऱ्या अर्थाने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्याची भूमिका घेतली आहे. महायुती सरकारच्या या भूमिकेचे निश्चितच स्वागत केले जाईल. असे रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र नेते श्री रमेश उबाळे व भीमशक्तीचे अरुण पवार यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात एकूण ३१४ स्वायत्त महाविद्यालये आहेत. यामध्ये मुंबई विद्यापीठातील
१३० स्वायत्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ७४ स्वायत्त महाविद्यालये आहेत. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), आणि इतर राज्य विद्यापीठांतर्गत उर्वरित महाविद्यालये येतात. सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत.

याव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्रात एकूण ४२,२३४ अनुदानित व विनाअनुदानित खाजगी शाळा कार्यरत आहे. यामध्ये शुल्क देऊन शिक्षण दिले जाते. राज्य सरकारच्या अनुदानातून बहुतांश खाजगी शाळा हे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसाठी तसेच उद्योजक यांच्यासाठी चांगले कुराण आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखाने ,सूतगिरणी नंतर आता शैक्षणिक संस्थेचा नंबर लागतो. स्वतःला जननायक ,लोकनायक, भाग्यविधाते, लाडके नेतृत्व
, विकासाचे शिल्पकार म्हणून घेणारे बडे मंडळी सत्तेपासून वंचित राहत नाहीत. हाच त्यांचा खराखुरा एक कलमी कार्यक्रम असतो. राज्यातील एकूण १,१०,२३४ शाळांपैकी सुमारे ७८,२३४ शाळा शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (उदा. जिल्हा परिषद, महानगरपालिका व पालिका आहेत) आणि उर्वरित खाजगी व्यवस्थापनामार्फत चालविल्या जातात. त्यावर सुद्धा कळत- नकळत राजकीय मंडळींचा वारे माप हस्तक्षेप असतो. यावर आता महाराष्ट्रातील बहुचर्चित महायुतीने निर्बंध घालण्याची जी भूमिका घेतली आहे. ती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. जे काँग्रेस सरकारला जमले नाही. ते महायुती करत असल्याने त्याचे आता समाज मनावर नोंद घेतली जात आहे. हे सुद्धा यानिमित्त स्पष्ट झाले आहे.

सध्या महाराष्ट्रात ३५ पेक्षा जास्त अधिकृत खाजगी विद्यापीठे
महाराष्ट्रात सर्व प्रकारची (शासकीय आणि खाजगी) मिळून अंदाजे २,३०० हून अधिक महाविद्यालये उच्च शिक्षण क्षेत्रात आपली छाप पाडत आहेत. सातारा जिल्ह्यात १६० पेक्षा जास्त उच्च शिक्षण महाविद्यालये आणि सुमारे ५०० हून अधिक खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने रयत शिक्षण संस्था सारख्या मोठ्या आणि नामांकित खाजगी संस्थांचे जाळे पसरलेले आहे.
स्वायत्ततेचा विचार केल्यास, सातारा जिल्ह्यातील प्रमुख कला, विज्ञान, वाणिज्य आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्था सातारा ही आशिया खंडातील मोठी शिक्षण संस्था आहे. समर्थ एज्युकेशनल ट्रस्ट, सातारा , सातारा एज्युकेशन सोसायटी , गौरीहर एज्युकेशन सोसायटी , कृष्ण फाउंडेशन कराड आणि फलटण परिसरात कार्यरत असलेल्या विविध शिक्षण संस्था.
आणि विद्यापीठ अनुदान आयोग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या अंतर्गत सातारा जिल्ह्यात महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. या सर्व शिक्षण संस्था शुल्क नियमक प्राधिकरणाच्या कक्षेत आणण्यासाठी नवीन वर्षात दमदार सुरुवात होईल अशी आशा आहे. सरकारी व खाजगी शिक्षण संस्थेमधील चार ते पाच पटीने शुल्क जास्त असते. आता खाजगी शिक्षण संस्थेत एफ आर ए कक्षेत आल्यानंतर खऱ्या अर्थाने अनेक खाजगी शिक्षण संस्था घास गुंडाळून ठेवण्याची शक्यता आहे. किंवा इतर संस्थेमध्ये मर्ज केले जातील असे भाकीत वर्तवले गेले आहे…………………….

Scroll to Top