ताज्या बातम्या

जावळीतील बडे मिया, छोटे मियाने राजेंच्या नादी लागू नये. मोर्चाद्वारे इशारा…

मेढा (अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मेढा नगरीत आज खऱ्या अर्थाने जावळीकरांचा मोर्चाद्वारे संताप व्यक्त करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा बँकेच्या संचालक ज्ञानेश्वर रांजणे यांच्या समर्थनार्थ निघालेल्या या मोर्चाला मेढा व केळघर परिसरातील अनेक ग्रामस्थ- भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जावळीतील माता-भगिनी उपस्थित होत्या. जावळी तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरीत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कोणताही वाहनाचा अडथळा न करता अत्यंत शांततेने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी अनेक वक्त्यांनी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व श्री रांजणे यांचे समर्थन केले. तसेच छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका करणाऱ्या बडे मिया व छोटे मिया अशा पद्धतीने उल्लेख करून वाशीनिवासी रेडीमेड नेता अंकुश कदम व एकनाथ ओंबळे यांच्यावर टीका केली. अशी चर्चा सुरू झाली.
माजी आमदार सदाशिव सपकाळ म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून जावळी तालुक्यात विकास कामे केली. त्याच्याही पुढे जाऊन भाजपचे लोकप्रतिनिधी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकास केल्यामुळे आज जावळी तालुक्यामध्ये प्रगती दिसत आहे. परंतु, काही जणांना मोठ्या माणसावर टीकात्मक बोलल्याशिवाय आपली नोंद घेतली जात नाही. असा भ्रम आहे. या ठिकाणी जमलेले छत्रपती शिवेंद्रराजे समर्थक यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या.
आक्रमकरित्या सातारा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी तर अंकुश कदम यांच्यावर टीका करताना शाब्दिक प्रहार केले .तीस वर्षापासून नवी मुंबईतील वाशीमध्ये आम्ही राहत आहे. वाशीमध्ये अंकुश कदम यांनी निवडणूक उभे राहायचे. पडायचे. त्या ठिकाणी आता अंकुश कदम यांचा फटाका फोडणार आहे. त्यांनी मोठे व्हावे. पण आमच्या नेते शिवेंद्रसिंह राजेंवर टीका करू नये. त्यांनी माझ्यावर बोलताना भान ठेवले नाही. माझं घर, माझी जमीन, माझी जागा, मी काही ही करू शकतो. वाटलं तर त्यांनी सुद्धा माझ्यासोबत नाचायला आले पाहिजे. मी गौतमी पाटीलला आणतो. असे त्यांनी विनोदी शैलीने सांगून या मोर्चामध्ये जान आणली.
या वेळेला जावळीचे सभापती सौरभ शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या मोर्चाला मेढा नगराध्यक्ष रूपाली वारागडे, नगराध्यक्ष विकास देशपांडे, दत्ता भालेघरे, रवी परामणे, शिवाजी गोरे, नितीन मगरे, कविता धनवडे, गोरख महाडिक ,अर्चना रांजणे तसेच आसणी, भोगवली, डांगरेघर ,आंबेघर, केडबे, पुनवडी, बोंडरवाडी, वकवडी, भुतेघर , सावली, गवडी, करंजे, मेढा, जवळवाडी, कुडाळ, बिभवी परिसरातील छत्रपती शिवेंद्रराजे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चाला गीता लोखंडे, आनंदी करंजेकर, विजय महाडिक, विजय शेलार, मच्छिंद्र शिरसागर, रामभाऊ शेलार, सागर धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते

जावळीत विकास कामे होत नसल्याने रोजगारासाठी रेडीमेड नेता अंकुश कदम मुंबईला गेले. चार वर्षातच त्यांनी कोटीची उड्डाण केले आहे. असा कोणता नोटा कमावणारा रोजगार करतात? याची त्यांना माहिती द्यावी. नंतरच आमच्या नेत्यांवर टीका करावी अशा शब्दात युवकांनी खड्डे बोल सुनावले.

— जावळी तालुक्यात दारूबंदी असताना भाषणामध्ये नेत्यांनी चपटीचा उल्लेख होऊन तथाकथित वारकरी शांत उभे होते.

Scroll to Top