मुंबई : मुलुंड पश्चिम येथील झोजवाला पेट्रोल पंपावरील कामगारांच्या मासिक वेतनात ४५०० रुपयांची वाढ करणारा करार महाराष्ट्र शक्ती कामगार सेनेने पंपाचे मालक सोहेब मोदी यांच्यासोबत नुकताच केला. हा त्रैवार्षिक करार असून प्रत्येक वर्षी प्रत्येक कामगाराला प्रतिवर्षी १५०० रुपये मासिक वेतन वाढ मिळणार आहे. यानुसार तीन वर्षात साडेचार हजार रुपयांची वाढ मिळणार आहे. हा करार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते गुरुनाथ खोत, माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शक्ती कामगार सेना या युनियनचे अध्यक्ष सगुण खोत यांनी केला. याप्रसंगी युनिट अध्यक्ष शरद सावंत, उपाध्यक्ष मनोज यादव, सेक्रेटरी मनोज कुमार यादव, विजय जैस्वार, दिनेश यादव, अजय जैस्वार आदी कामगार पदाधिकारी उपस्थित होते.भरीव वेतनवाढ करणारा करार दिवाळीपूर्वी झाला याबद्दल कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र शक्ती कामगार सेना ही युनियन भारतीय कामगार सेनेची संलग्न युनियन आहे,असे या युनियनचे अध्यक्ष सगुण खोत यांनी सांगितले.
झोजवाला पेट्रोल पंपाच्या कामगारांना भरघोस पगारवाढ
November 4, 2026 / 1 minute of reading




