ताज्या बातम्या

शिवसेनेतर्फे तर्फे बोरीवली येथे सुगंधी उटणे वाटपाचा शुभारंभ

मुंबई : दिवाळी सणाचा आनंद, मांगल्य आणि आपुलकीची भावना जपत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र. १, मागाठाणे विधानसभा, शाखा क्र. १२, बोरीवली (पूर्व)च्या वतीने नगरसेविका सौ. सारिका शशिकांत झोरे यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी सुगंधी उटणे वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून दिवाळीचा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा आणि नागरिकांसोबतचे जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी मागाठाणे विधानसभाप्रमुख श्री. अशोक म्हामुणकर, उपविभागप्रमुख श्री. योगेश भोईर, नगरसेवक श्री. धर्मेंद्र काळे, विधानसभा समन्वयक श्री. राजू मुल्ला, विधानसभा निरीक्षक व सिनेट सदस्य श्री. शशिकांत झोरे, महिला उपविभाग संघटक सौ. सिमिंतीनी नारकर, उपविभागप्रमुख श्री. चेतन कदम, विधानसभा संघटक श्री. हनुमंत मोरे, समन्वयक श्री. तुकाराम पालव, समन्वयक सौ. शुभदा सावंत, सौ. सुप्रिया बोवलेकर, शाखाप्रमुख श्री. सचिन मोरे, शाखासंघटक सौ. माधुरी खानविलकर, शाखा समन्वयक श्री. योगेश देसाई, शाखाप्रमुख श्री. नितीन नाईक आणि शाखा समन्वयक सौ. इतिश्री महाडिक यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top