सातारा(अजित जगताप ) : काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षासोबत आघाडी केली नाही तर वंचित मताची विभागणी करते. असा आरोप केला जातो. परंतु, हा सरळ सरळ जातीयवाद असून भाजपशी युती- लग्न व सगेसोयरे करणारे भाजपा- राष्ट्रवादी व काँग्रेस हेच खरे जातीयवादी आहेत. असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सातारा येथे शिक्षक व पदवीधर उमेदवाराच्या प्रचारानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघामध्ये सभा, रॅली व पत्रकार परिषदा घेऊन काही फरक पडत नाही. कारण, प्रत्येक मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपली भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यामुळे काही पक्ष व उमेदवार प्रसिद्धीतून पैसा व वेळ वाया घालवत आहे. असे स्पष्ट करून सुजात आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले. शिक्षक व पदवीधर मतदार संघातील मतदार हे विद्या विभूषित असतात. वंचित बहुजन आघाडीचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार इकबाल चंदलाल शेख व पदवीधर मतदार संघातील प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्या प्रचारानिमित्त सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि आता सातारा येथे त्यानंतर पुणे जिल्ह्यात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. पुणे येथे एम.पी.एस.सी. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहे. असं त्यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कुंभमेळ्यासाठी असणारा निधी दुष्काळी भागाला मिळावा. तसेच विद्यार्थ्यांना फी माफी, शेतकऱ्यांना बियाणे व खत वाटप करण्यात यावी. शेतमजूर- कष्टकरी गावकुसाबाहेर समाजासाठी२०२९ व २०२४ रोजी वंचितच्या वतीने जाहीरनामा काढण्यात आला होता. वंचित घटकासाठी आमची ठोस भूमिका आहे. कुंभमेळाव्याचे बजेट ३२५ कोटी आहे. हा कुंभमेळावा प्रातिनिधिक स्वरूपात करावा अशी त्यांनी मागणी केली आहे. देशाच्या निवडणूक आयोगाने ७७ लाख मतदारांची मतदार यादीतून नावे गायब केले आहेत. तर मतदानादिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतर मतदारांच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. जी लोकशाहीसाठी घातक आहे. रिपब्लिकन बहुजन महासंघ सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी चळवळीतील संघर्ष व विचारांचे वजन पेलणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी पक्षांतर केले आहे. आम्ही नेहमीच भारतीय जनता पक्ष व आर.एस.एस. यांना वैचारिक दृष्ट्या विरोध करून अंगावर घेत आहे. नवी दिल्ली व पुणे येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन होत आहे. पूर्वी पंजाब येथील जालियनवाला बाग या ठिकाणी जनरल डायर यांनी गोळीबार केला होता. आताचे मोदी सरकार कायर आहे. जंतर-मंतरवर १९४७ पासून आंदोलन होत आहे .पर्याय सरकार जन आंदोलनाच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांना अटक करत आहे. असाही सुजात आंबेडकर यांनी दावा केला. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पोताडे, पदवीधर उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे, शिक्षक उमेदवार इकबाल चंदलाल शेख, वंचित सातारा जिल्हा अध्यक्ष अँड .दयानंद माने, युवक जिल्हाध्यक्ष अमोल गंगावणे, मनोहर सावंत ,सुनील कदम यांच्यासह वंचितचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला दिलखुलासपणे व मुद्देसूद उत्तर देऊन सुजात आंबेडकर यांनी वंचित भूमिका मांडली. ………………………… फोटो- सातारा येथे शिक्षक व पदवीधर मतदार संघाबाबत पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना वंचितचे नेते सुजात आंबेडकर (छाया- दिनानाथ जगताप, सातारा)




