मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघात दिवाळी अंकांचे आकर्षक प्रदर्शन व विक्री दालन सुरू झाले आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांच्या शुभहस्ते या दालनाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, जगदीश भुवड, विनोद साळवी, ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर यांच्यासह अनेक मान्यवर, पत्रकार आणि दिवाळी अंकांचे संपादक उपस्थित होते.
या प्रदर्शनात विविध विषयांवरील दर्जेदार दिवाळी अंक एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत. साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी ही एक उत्तम पर्वणी ठरणार आहे.
चला तर मग, दिवाळी अंकांच्या साहित्यिक मेजवानीचा आनंद घेऊया!




