मुंबई (मोहन कदम /शांताराम गुडेकर ) : साई परिवार सेवाभावी ट्रस्ट तर्फे गेली ३६ वर्ष राबवण्यात येणारा पितृपक्षातील अन्नदान कार्यक्रम श्री.मंगेश अंकुश रासम यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला.अनेकांची साथ लाभल्यामुळे हा कार्यक्रम ३६ वर्ष पूर्ण होऊ शकला.आज पर्यंत अनेक आश्रम शाळा,अनाथ आश्रम,वृद्धाश्रम, मूकबधिर शाळा,बेघर निवारा केंद्र येथे यथाशक्ती मदत करण्यात येत आहे.यावर्षी ४ ऑक्टोबर २०२६ रोजी आश्रम शाळा,मान विक्रमगड येथे पितृपक्षातील अन्नदान कार्यक्रम राबविण्यात आला.यानिमित्ताने क्रीडा साहित्य, खाऊ,शैक्षणिक साहित्य तसेच मुलांना वडापावचे नाश्ता व दुपारी सुग्रास जेवण असा कार्यक्रम करण्यात आला.यासाठी अमूल्य योगदान श्री.अनिल वडके, श्री.संतोष बडंबे,श्री.विनयसिंग,श्री. पंकज नाईक,महेश वर्मा,समीर सागवेकर,डॉ.रेवती आळवे,संदेश कनगुटकर,सौ.नंदा चौधरी, रजनी उमरसकर, सुजल राणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.चेतन ठाकरे,श्री.तुलसीदास तांडेल,यशवंत व आश्रमाचे कर्मचारी व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.अनेकांनी यानिमित्ताने साई परिवार सेवाभावी ट्रस्ट पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक यांचे कौतुक करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.




