सांगली (अजित जगताप) : उच्चशिक्षित व सामाजिक जाणीव असणारे महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख- जाधव यांना लहानपणापासून ओळखतो. त्यांच्या सामाजिक कार्याची नोंद सुशिक्षित मतदार घेऊन त्यांना विजयी करतील. यासाठी सर्वप्रचाराकांसोबत आम्ही जिवाचे रान करू अशी भीमप्रतिज्ञा जय हिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी सांगली येथे केली. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षदा देशमुख- जाधव यांना प्रचार निमित्त उदंड प्रतिसाद लाभत आहे. सामाजिक जाणीव व तळागाळातील लोकांसाठी झटणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. आमचे मित्र अमृतराजे निंबाळकर यांच्या त्या भाची असल्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची लहानपणापासून आम्हाला ओळख आहे. त्या हो करतो गाडीवर घरांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच गुलाल घेऊनच विजय होतील. असा यावेळी श्री चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला. निवडणुका म्हटल्या की, आरोप- प्रत्यारोप होतो. परंतु, हर्षदा देशमुख- जाधव यांनी सामाजिक कार्यातून ग्रामीण भागातील लोकांच्या मध्ये जाऊन कष्टकरी-शेतकरी-सुशिक्षित युवक- युवती आणि सामाजिक जाण असलेल्या तरुण पिढीसोबत विधायक व रचनात्मक काम केले आहे. सातारा- सांगली- कोल्हापूर- पुणे-सोलापूर या बहुचर्चित पुणे पदवीधर मतदार संघामध्ये त्यांचा दांडगा संपर्क असल्यामुळे नव्याने ओळख करून देण्याची गरज निर्माण झाली नाही. त्यांच्या प्रचारासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता उस्फूर्तपणाने पदवीधर मतदार स्वतःहून सहभागी होत आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून तरुणांच्या अपेक्षा होत्या. त्या पूर्णपणे फोल ठरल्या आहेत. त्यामुळेच तरुणांच्या मताला किंमत आलेली आहे. राजकीय पटलावर प्रस्थापित घराण्यातील सेनापती तिकडे आणि सैन्य इकडे अशी पुणे पदवीधर मतदार संघात अवस्था पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख जाधव यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ नेते अमोलनाना शिंदे, प्रवीण पाटील, नलिनी पवार, राहुल कांबळे, पुष्पा माने, रंजना महाडिक यांच्यासह शेकडो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकजुटीने शांततामय वातावरणात प्रचार करत आहेत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी लोधवडे येथील गावचा स्वच्छता मोहिमेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक पोहोचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सातारा- सांगली जिल्हा पूर्वी जशा पद्धतीने एकत्रित होता. तसे राजकीय आता वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्तेचा उत्साह वाढला आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातही उदंड प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, पुणे येथील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्यासाठी एम.पी.एस.सी. विरोधी आंदोलन होत आहे. आता पुणे पदवीधर ग्रामीण भागातील मतदारसंघातही हे हक्काचे आंदोलन पोहोचले आहे. साताऱ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याबाबत जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, सोमनाथ धोत्रे, रामभाऊ मदाळे, सलीम बागवान, राजेंद्र ओव्हाळ, सुनील ओव्हाळ यांच्यासह विविध तळागाळातील कुशल कुशल काम करणारे पदवीधरांनीही सहभाग घेतला. सत्ताधाऱ्यात विरोधात सामान्यांचा आवाज आता चांगलाच घुमू लागला आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे. अशी माहिती निवडणूक विश्लेषक संजय जाधव यांनी दिली. ………………………………… फोटो- सांगली येथे महाविकास आघाडी पुणे पदवीधर उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांना पाठिंबा देताना जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख व मान्यवर (छाया- अजित जगताप, सांगली)




