ताज्या बातम्या
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात; शरद पवार यांच्या हस्ते रामशेठ ठाकूर यांना जीवनगौरव; संजूबाबा गायकवाड यांना ‘शरद रत्न’ पुरस्कारग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या संचालकपदी मुकेश मोहिते यांची नियुक्तीतांभाड येथे पिक नुकसान पंचनाम्याची आमदार दिलीप लांडे यांनी केली पाहणी; शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याच्या सूचनागरजू विदयार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप – पंचरत्न मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रममुलुंडच्या ‘मराठा मंडळ मुलुंड, मुंबई ‘ त्रैवार्षिक निवडणुकीत ‘अजिंक्य पॅनल’चा ऐतिहासिक विजय….. शिवाजी सावंत यांची अध्यक्षपदी निवड

ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या संचालकपदी मुकेश मोहिते यांची नियुक्ती

कराड(प्रताप भणगे) : भारत सरकार मान्यताप्राप्त पुणेस्थित ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या संचालकपदी कराडचे मुकेश मोहिते यांची संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर आणि संस्थेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिते यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

*या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मुकेश मोहिते म्हणाले,* “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच सामाजिक बांधिलकीची एक मोठी संधी आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांना अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी तसेच रुग्णांचे हक्क, आरोग्यविषयक जनजागृती आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. संस्थेने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.”

ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे आयोजित सर्वसाधारण सभेत ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित संचालकांना नियुक्तीपत्र व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

*यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,* संस्थेने सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव आणि माणुसकीची शिकवण समाजात रुजवली आहे. आरोग्याच्या प्रश्नांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम परिषद करीत आहे. आरोग्यसेवा ही केवळ उपचाराची प्रक्रिया नसून समाजाच्या संवेदनशीलतेची कसोटी आहे. रुग्णाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्यव्यवस्थेकडे पाहण्याची गरज आहे. साहित्य आणि आरोग्य या क्षेत्रांतील संवादातून सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडू शकते.

यावेळी डिसेंबरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या आरोग्य साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंडियन मेडिकल असोसिएशनचे पुणे शहराध्यक्ष व माजी महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. डॉ. भोंडवे यांच्या २४ हून अधिक ग्रंथांचे प्रकाशन झाले असल्याचेही डॉ. सबनीस यांनी नमूद केले. तसेच पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाच्या कार्यवृत्तांत पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

*माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे* यांनी ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन चे कार्य सामाजिक जाणीव आणि आरोग्यसेवेचा समन्वय साधणारे असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्याची भावना बळकट होते, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, डॉ. अविनाश भोंडवे, प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, उमेश चव्हाण, माजी सहायक पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, माजी विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद गायकवाड, जानमहम्मद पठाण, अपर्णा मारणे-साठे, राजकीय विश्लेषक मुकेश मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

फाउंडेशनचे कार्यकारी संचालक अशोक शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी आभार मानले. माजी विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आला.

Scroll to Top