सायगाव(अजित जगताप) : विविध विकास कामांबाबत स्थानिक मतदारांचा अल्प कालावधीत भ्रमनिरास झाल्यामुळे अनेक युवकांचा आवाज उमटत आहे. याची सुरुवात जावळी तालुक्यातील कदमवाडी या ठिकाणी झाली आहे. युवकांनी स्वयंस्पृतिने राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकली आहे. या युवकांचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्वागत केले आहे. आरक्षणाचे जनक असलेले युगपुरुष राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जतन करण्यासाठी युवकांनी हाती लढा घेतला आहे. सर्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचली पाहिजे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कटिबद्ध आहे. याची जाणीव झाल्यामुळे युवकांचा मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश झाला आहे. आगामी काळात जावली तालुक्यातील पुरोगामी विचारांचे युवकच विकासाचा रथ हाती घेतील, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
कदमवाडी, ता. जावली येथे विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या युवक व स्थानिक ग्रामस्थांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कदमवाडी परिसरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढली आहे. आगामी काळात युवकांना पक्ष संघटनेत अधिकाधिक संधी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शिक्षण असूनही नोकरी नाही. उद्योग नाही. टक्केवारीच्या राजकारणातून आता कार्यकर्ता कम ठेकेदारांची फौज एका बाजूला दुसऱ्या बाजूला गावच्या प्रामाणिक विकासासाठी झटणारे युवक असे चित्र दिसत आहे. ज्यांना सत्ताधारी पक्षाचा भा माहित नाही. सामाजिक कार्याचा कसलाही अनुभव नाही. असे काही स्वीकृत सदस्याची मागणी करत आहेत. त्यांनी सामाजिक कार्याचा अनुभव घ्यावा. नंतरच स्थानिक जनतेतून निवडून यावे. खर्च करायला नको म्हणून ते स्वीकृत सदस्यासाठी मागणी करत आहेत का? असाही सवाल काहींनी केला आहे.
यावेळी पक्षाचे जावळी तालुकाध्यक्ष सचिन गोगावले , ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे संचालक चंद्रकांत गवळी,प्रमोद पवार, रोहित रोकडे, सुनील फरांदे यांच्यासह सायगाव भागातील अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रवेश केलेल्या युवकांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्वागत केले . आगामी काळातील सामाजिक व विकासात्मक कामांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सायगाव भागातील कदमवाडी येथील प्रतीक कदम, अभिषेक कदम, तुषार कदम, सुशांत कदम, वृषभ मोरे, शिवम धुमाळ, शुभम धुमाळ, कुमार करंजकर, विशाल तोडकर, अभिजीत भोसले, अक्षय मोरे, मदन मोरे, दत्तात्रय कदम, विश्वजित धुमाळ, प्रशांत मोरे, सचिन करंजकर, राज भोसले, प्रेम भोसले, सिद्धेश धुमाळ, अथर्व कदम, देवराज मोरे आणि स्वराज मोरे यांनी स्वखुशीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. हा भाजपचे गुणगान गाणाऱ्यां स्थानिक लोकप्रतिनिधींचा पराभव मानण्यात येत आहे. यामध्ये वरिष्ठ नेत्यांचा दोष नाही. असे काहींनी प्रामाणिकपणाने कबूल केले आहे.
यावेळी उपस्थितांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पुरोगामी राजकारण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. जावळी तालुक्यात वाडी वस्ती व गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी वेग घेत आहे. यामध्ये जवळी तालुक्यातील पुरोगामी विचारांच्या युवकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
या पक्षप्रवेशामुळे कदमवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नव्या युवक कार्यकर्त्यांची साथ मिळाली आहे . आगामी काळात जावळी तालुक्यात पक्ष संघटना अधिक जोमाने उभी करण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय होणार आहेत. त्याचीही दमदार सुरुवात असल्याचे सांगण्यात आले. ……………………………….. फोटो – सायगाव भागातील कदमवाडी पक्षप्रवेशाचे स्वागत करताना राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे




