ताज्या बातम्या

शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना मुख्य नेते,संवेदनशील उपमुख्यमंत्री सन्मा.श्री.एकनाथजी शिंदे,शिवसेना नेते खासदार डॉ.श्रीकांत जी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव व प्रवक्ते श्री.किरणजी पावसकर, शिवसेना सहसचिव श्री.एकनाथजी शेलार, मा.आमदार श्री.रुपेशजी म्हात्रे व सह लोकसभा प्रमुख दक्षिण मुंबई चे श्री.दिलीपजी नाईक यांच्या शुभहस्ते तसेच शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेचे अध्यक्ष व वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री.जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन नरिमन पॉईंट येथे शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र वाटप करण्यात आले. सन्मा.किरण पावसकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन शिवसेना संघटनेचे विचार तळागाळात सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून संघटना वाढवा व जनतेला मदत करा.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.अमित पै.,श्री.अमर ढेरे,जिल्हा संघटक(क्रीडा विभाग),श्री.सुहास साळोखे, जिल्हा सचिव पदी श्री.श्रीकांत माजगावकर, सहसचिव पदी श्री.चंद्रकांत वडर,श्री.भूषण मिटके,ठाणे पाचपाखाडी विधानसभा सचिव पदी मनिषा म्हात्रे, सहसचिव पदी शीतल धुमाळ यांना नियुक्ती पत्र व सर्व पदाधिकाऱ्यांना ओळख पत्र वितरण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेच्या राज्य प्रवक्त्या सौ.सुषमा राऊत,ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्षा स्मिता देवकर पाटील,वैद्यकीय मदत कक्षाचे मुंबई सचिव डॉ.नवीन शेवाळे, राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.सुखदेव सस्ते,ठाणे शहर सचिव श्री.अनिल खेताडे, जुईनगर सचिव नवी मुंबई श्री.धनाजी जगताप व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Scroll to Top