ताज्या बातम्या

जरांगेंना संपवण्याचा डाव की शिंदेंची बदनामी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणः ऑडियो क्लिपची फॉरेंसिक तपासणी करून सत्य जनतेसमोर आना

कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) : मनोज जरांगे पाटील यांनी जी ऑडिओ क्लिप जाहिर केली आहे. ही बाब गंभीर आहे. मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व संपवण्यासाठी पैसे दिल्याचे दाखवण्याचा जो प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची बदनामी करून त्यांच्याही नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न करून त्यांची बदनामी करण्याचा कुटील डाव रचला जात आहे की काय याची चौकशी होणे गरजेचे आहे. ह्या संबंधित ऑडोओ क्लिपची फॉरेंसीक आणि तांत्रिक विश्लेषन करून सत्यता बाहेर येणे गरजेचे आहे असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,

मराठा आंदोलनाशी संबंधित ऑडिओ क्लिप जाहिर झाली आहे. यातील थोडासा जरी भाग सत्य असेल, तर महाराष्ट्र कुठे चालला आहे, असा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण मनोज जरांगे-पाटील यांनी पैसे स्वीकारूनआंदोलन संपवले, असे दाखवून त्यांचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न एका बाजूला केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कराराचा मुद्दा उपस्थित करून त्यांची बदनामी करण्याचा आणि त्यांचे नेतृत्व संपवण्याचा कुटील डाव सुरू

असल्याचे दिसत आहे.

ऑडिओ क्लिपचे फॉरेन्सिक आणि तांत्रिक विश्लेषन करण्याची गरज असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त करत या क्लिपमध्ये नेमके कोणाचे आवाज आहेत, हे आवाज खरोखरच फोनवरील कॉन्फरन्स

कॉलचे आहेत की ही क्लिप बनवण्यात आली आहे, हे तांत्रिक तपासातून स्पष्ट होऊ शकते असे सांगत या प्रकरणातून कोणाला

संपवण्याचा आणि कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी केली.

चौकट

दोन फोटो आले तिसरा येणारच

एपस्टीन फाईलबाबत मी १ डिसेंबरला केंद्रिय तेलमंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या बद्दल विधान व्यक्त केले होते. अमेरिकेत घडलेल्या या प्रकरणामध्ये त्यांचे नाव याचबरोबर अन्य तीन जनांची नावे आहेत. असे मी सांगितले होते त्यानुसार एपस्टीन फाईलमधील दोन फोटो बाहेर आले ते खूप काही सांगणारे आहेत. जेव्हा हरदीपसिंह पुरी यांच्या नावाचा खुलासा केला त्यावेळी त्यांनी एपस्टीन यांना ३ वेळा भेटलो मात्र त्या भेटी शिष्टमंडळाचा भाग म्हणून झाल्या. प्रत्यक्षात मात्र आता तुम्ही सर्वांनी ते फोटो पाहिले आहेत. ते फोटो शिष्टमंडळातील भेटीचे होते का? आता दोन फोटो समोर आले आहेत बाकीचे येणारच.

अमेरीकेत नोव्हेबरमध्ये मध्यावधी निवडणूका; ट्रम जाणार !

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूका होणार आहेत. या निवडणूकामध्ये ट्रप यांच्या पक्षाचा पराभव होईल कारण काँग्रेसची दोन्ही सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटटिव्हज आणि सिनेट यामध्ये त्यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, त्यानंतर ट्रप यांना महाभियोगाचा सामना करावा लागू शकतो आणि त्यांना पद सोडावेही लागू शकते. कारण त्यांचे वर्तन तसे राहिले आहे. ज्या संसदेने एपस्टीन फाईलमधील कागदे सार्वजनिक करण्याचा कायदा केला आहे. त्यामुळे ही कागदे सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्याबाबत आणखी काय समोर येईल हे सांगणे कठिण असले तरी सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्या पाहता परिवर्तन अटळ असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

Scroll to Top