मुंबई (शांताराम गुडेकर ) : कर्मवीर भाऊराव पाटील कला व वाणिज्य महाविद्यालय, ठाणे यांच्या विद्यमाने आयोजित कै.श्री.बी.बी.मोरे स्मृती राष्ट्रीय निबंध स्पर्धा २०२६ मध्ये जी.के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळविले.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेसाठी ‘विकसित भारत २०४७ आणि शाश्वत विकास’ हा विषय देण्यात आला होता.या स्पर्धेत महाविद्यालयातील कु.दैवता सुधीर खारीक (एम.ए.इतिहास) व कु.सदिका खान (एस .वाय.बी.ए.) यांनी सहभाग घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले.
या यशाबद्दल संचालिका सौ.कविता शिकतोडे मॅडम,संस्थेचे पदाधिकारी डॉ.बी.ए.एल. जाधव व प्राचार्य डॉ.एस.जी.सागर सर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य शफिक शेख यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.सौ.मोहिनी शेलार यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.




