मुंबई (शांताराम गुडेकर ) : दिल्ली येथे सहिष्णु भारताचे रक्षणकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे “जीवन आणि वारसा”यावर दि.२ सप्टेंबर आणि ३ सप्टेंबर २०२६ रोजी कन्व्हेन्शन सेंटर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली मध्ये स्वातंत्र्यकाळानंतर पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांवर विशेष कार्यक्रम पार पडला.यामध्ये मूळ गाव मु.पो.निजामपूर ता . माणगाव जि.रायगड असलेले पण पुणे येथे रहात असलेल्या महेश कर्डे यांच्या पुणे येथे जन्म झालेले सुपुत्र श्री.सौरभ कर्डे यांनी लिहिलेला माहितीपट श्री शिव समाधी जिर्णोध्दार हा (मुळ मराठी : हिंदी मध्ये अनुवादीत ) या कार्यक्रमात पुर्ण प्रदर्शित करुन दाखवण्यात आला.तसेच विद्यापीठालाही अध्यासनासाठी सोपवण्यात आला.यावेळी या माहितीपट ‘लिखाणासाठी’ सौरभ कर्डे यांना पुरस्कारीत अन सन्मानित करण्यात आले.देशप्रसिध्द वक्ता मा.खा.सुधांशुजी त्रिवेदी यांच्या शुभ हस्ते अनावरण आणि सन्मान प्रदान करण्यात आले.या प्रसंगी मा.छ.बाबाराजे भोसले ( तंजावर ), मा.जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी कुलगुरु डॉ..पंडीत मॕडम, मा.रघुजीराजा आंग्रे हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘chatrapati shivaji life & legacy’ या दोन दिवशीय सेमिनारमध्ये काश्मिर, दिल्ली, पंजाब, उ.प्रदेश, छत्तीसगढ, म.प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र अशा राज्यांत मिळून (७००पेक्षा अधिक )पदवीधर इतिहास संशोधक,अभ्यासक सहभागी झाले होते.यावेळी छत्रपती शिवरायांच्या इतिहासावरील ६५ रिसर्च पेपर मांडण्यात, सादर करण्यात, अभ्यासात समाविष्ट करण्यात आले.फिल्म केवळ एकच होती. ती कर्डे यांनी बनवलेली होती.जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी
मध्ये शिवछत्रपतींचा जयघोष अन असा सेमिनार घडण, हे देशात पहिल्यांदा घडल आहे.यानंतर IIC, intach, my home india या संस्थाना कर्डे यांनी भेट दिली.intch (indian national trust for art & cultural heritage )पंतप्रधान आणि इतिहास तज्ञांच्या सल्ल्याने देशाच्या सांस्कृतीक आणि प्राचिन वारसा च जतन संवर्धन करणाऱ्या सर्वात मोठ्या संस्थेच्या मुख्यालयात श्री.कर्डे यांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला. हा सन्मान INTACH चे नॕशनल चेअरमन मा.श्री.डाॕ.अशोक सिंह ठाकूर यांच्या शुभहस्ते झाला.संस्थेच्या कार्यपध्दतीची माहिती देण्यात आली.यानंतर विशेष परवानगीने प्रधानमंत्री संग्रहालय आणि संसद भवन या दोन्ही वास्तू अभ्यासपुर्ण पाहण्यात आल्या.




