ताज्या बातम्या

साताऱ्यातील मॅरेथॉन स्पर्धेच्या यशाने ..अनेकांची आतापासूनच तयारी…

सातारा(अजित जगताप ) : सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचे केंद्रबिंदू म्हणजे शरीर संपदा होय. या शारीरिक जिद्द ,चिकाटी व सातत्यपूर्ण धावण्यामुळे अनेकांना फायदा होत आहे. अशा व्यक्तींसाठी व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या साताऱ्यातील हाफ मॅरेथॉन स्पर्धा आता खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरले आहे. ज्यांनी आपल्या डोळ्यांनी मॅरेथॉनचा उत्साह पाहिला. त्यांनीही आतापासूनच धावण्याचा सराव सुरू केला आहे. थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीने आता सातारा हाफ मॅरेथॉन पूर्णत्वाकडे चालली आहे.
निसर्गरम्य कास पठारातील अवघड वळणावरून मार्गक्रमण करताना खऱ्या अर्थाने आपल्या शारीरिक क्षमता मूल्यमापन करण्याची संधी मिळालेली आहे. हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सांगलीचे धावपटू प्रवीण कांबळे,
अभिषेक कमन्ना देवकाते, इतर वयोगटातील कालिदास लक्ष्मण हिरवे,अनंत घी. गावणकर
सुमित सुनील मोरे, अनिल शिवाप्पा कोरबी,
गणेश विठ्ठल बागुल,मनोज सुरेश राणे,
परशराम लक्ष्मण भोई,मल्लिकार्जुन धनप्पा पारडे,मनोहर मारोत्राय चारई, सुनील ईश्वर शिवणे,आर. बी. एस. मोनी

महिला गटातील राणी सदाशिव मुचंडी,
निशा आनंद पासवान,संतोषी महादेव नरळे अकिता,आरती श्रीपती काय,प्रणीता प्रदीप बाबर, ज्योती ठाकरे,सिंधु उमेश ,रैनी सिंग
पिती राजेंद्र बाघ,समाप्रिया चेतन गाई,पांडया अर्पिता, रत्ना आशिष मेहता,पूजा सितेश माहेश्वरी,पूजा झुनझुनवाला, पल्लवी महेश मूग
निकिता गोविल,नित्तिमा मनोज भट्टगावकर
क्रांती प्रमोद साळवी,बिमला बनवाला,प्रेयसी प्रेमानंद चारी, क्रिस्टीन मारिया सालदांहा
गरिकापती जगदेश्वरी,सुचरिता अशोक कुमार यांनी तर सुमारे दीड ते दोन तास आपले पाय आणि रस्ता यांची युती टिकून ठेवली. खरं म्हणजे दर दिवशी केलेल्या सरावाचे असते फलित ठरले आहे. या स्पर्धेचे संयोजक असणाऱ्या सर्वांनीच आपापल्या परीने चांगली सेवा दिलेली आहे. डॉक्टर प्रतापराव गोळे, डॉ. कौशिक पाटील डॉक्टर संदीप काटे, डॉक्टर शेखर घोरपडे, उपेंद्र पंडित व संयोजन समिती सोबतच वरिष्ठ शासकीय अधिकारी पोलीस दल होमगार्ड स्वयंसेवक आणि पल्स हॉस्पिटलचे कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान लाभलेले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसोबतच सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिला. रविवारी सुट्टीचा दिवस असताना सुद्धा अनेकांना या स्पर्धेने पोलीस कवायत मैदान व कास पठारावर जाण्यासाठी प्रेरित केले होते. एकूणच हाफ मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे खऱ्या अर्थाने स्पर्धा ठरली आहे.

———————————————-

सातारा येथील हात मॅरेथॉन स्पर्धेतील काही क्षणचित्रे (छाया- निनाद जगताप सातारा)

Scroll to Top