ताज्या बातम्या

अहिल्या नगरात प्रथमच “राज आनंद प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी” आपल्या सेवेत

अहिल्या नगर :आधुनिक तपास सेवेची अधिकृत सुरुवात; नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार असून
सध्याच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात वैयक्तिक, कौटुंबिक तसेच व्यावसायिक पातळीवर विविध प्रकारच्या फसवणूक, संशयास्पद व्यवहार आणि माहिती पडताळणीची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना विश्वासार्ह, गोपनीय आणि कायदेशीर चौकटीत राहून व्यावसायिक तपास सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तज्ञ आणि हुशार फिल्ड ऑफिसर, चाणाक्ष कर्मचारी, अनुभवी टीमसह
“राज आनंद प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी” या संस्थेची अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे.

एजन्सीमार्फत ग्राहकांच्या गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक प्रकरणाची काळजीपूर्वक हाताळणी केली जाणार आहे. सत्य परिस्थितीचा शोध घेणे, आवश्यक माहिती संकलित करणे आणि ग्राहकांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देणे, हे संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचे संचालक विठ्ठल राज शिंदे यांनी सांगितले आहे,

राज आनंद प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये आधुनिक कार्यपद्धती, शिस्त, वेळेचे नियोजन आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. समाजात विश्वासार्ह तपास सेवा उपलब्ध व्हावी आणि नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने संस्था कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिक, उद्योग-व्यवसाय, व्यापारी, संस्था तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींना आवश्यक असलेल्या माहिती पडताळणी व तपासविषयक सेवांसाठी ही एजन्सी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

संस्थेच्या कार्याचा पाया “विश्वास – गोपनीयता – सत्य” या त्रिसूत्रीवर आधारित असून प्रत्येक ग्राहकाला दर्जेदार आणि समाधानकारक सेवा देण्याचा निर्धार एजन्सीने व्यक्त केला आहे. अधिक माहितीसाठी संचालक विठ्ठल राज शिंदे मोबाईल नंबर 7709392052,/ 9405012052 या वर संपर्क साधावा. असे आवाहन या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Scroll to Top