सातारा (अजित जगताप) : वडार पॅंथर संघटनेच्या वतीने साताऱ्यात होत असलेल्या युवक व वधू वर मेळावा अत्यंत उपयुक्त आहे. आता स्पर्धेत टिकून ठेवण्यासाठी वडार समाजाने मुला-मुलींना शिक्षणाचे महत्व पटवून दिले पाहिजे तरच ते कष्टाच्या कामातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडतील. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे केले.
सातारा येथील धनलक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या वडार पॅंथर संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडार पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद इरसल होते. यावेळी इंदापूरचे नगरसेवक अनिल पवार, माजी नगराध्यक्ष मोहन शिंगाडे, नगरसेवक अंबादास धोत्रे, शेनोली सरपंच नारायण शिंगाडे, दादा सौ . पूजा सचिन कुराडे,भरत देवरासे, प्रमोद पवार, कुमार धोत्रे, महादेव जाधव , मनोहर मुधोळकर ,विशाल पवार, योगेश पवार याचबरोबर संयोजक असलेले सातारा जिल्ह्याचे वडार समाजाचे नेते सोमनाथ धोत्रे, शैलेश बाबा जाधव, रमेश विटकर, श्रीकांत देवकर, सागर धोत्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वडार समाजाच्या वधू-वरांसाठी नामदार भोसले यांच्या हस्ते वेबसाईटचे अधिकार उद्घाघाटन करण्यात आले. त्यानंतर नामदार भोसले म्हणाले, साताऱ्यातील छत्रपती घराण्याचे व साताऱ्यातील वडार समाजाचे ऋणानुबंध आहेत. अनेकांनी या शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. कर्तव्यवान आणि मनाने श्रीमंत असणारी वडार समाजातील लोकांनी अनेक राजकीय कार्यक्रम घेतले असतील परंतु, समाजातील मुलांचे लग्न जुळवण्याचे हे कार्य सत्य आहे. यातून दोन कुटुंबांचे संबंध दृढ होणार आहेत. समाधानाने नाती फुलणार आहेत. वडार समाज हा काबड कष्ट करून पुढे आलेला आहे. जीवाला धोका असूनही खाणीमध्ये काम केले आहे. काहींच्या मृत्यू झाला .त्यावेळी कायदा नव्हता. आता कायदा आलेले आहेत परंतु, शिक्षणाचे महत्त्व सर्व मुलांना पटवून दिल्यानंतर वडार समाजातील आय.ए.एस. आय.पी.एस. अधिकारी घडू शकतात .असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
सध्या दिनचर्यासाठी कष्ट करण्याशिवाय वडार समाजाला पर्याय नाही. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण पण मुलांचे शिक्षणाचे प्रमाण वाढवले पाहिजे. इतर छोट्या जातीतील लोकांनी शिक्षण घेऊन अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांचा आता आदर्श घेतला पाहिजे. सध्या पदवीधर ही काळाची गरज आहे. असे त्यांनी सांगितले.
वडार समाजाच्या प्रश्नाबाबत सोडवणूक करण्यासाठी वेळेप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणू असे. त्यांनी आश्वासन दिले. सध्या वडार समाजाचे महामंडळ करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. चर्चा करू. सरकारशी भांडावे लागेल. वेळ पडल्या रस्त्यावर आंदोलन करावे लागेल. असे त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यामध्ये वडार समाजाच्या वधू- वर यांचे लग्न जुळल्यानंतर त्यांनी मला पत्रिका द्यायला विसरू नये. असे त्यांनी विनोदाने सांगितले . आम्ही सातारकर म्हणून सर्व समाज एकच आहोत. आपल्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी अभिवचन दिले यावेळी नामदार भोसले यांचाही सत्कार करण्यात आला.
मान्यवरांचाही वडार पॅंथर संघटनेच्या वतीने त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संदीप पवार, मच्छिंद्रनाथ जाधव, वनिता पवार, दीपक नलवडे ,रवी माने, भाऊ पवार ,आप्पासाहेब पवार तसेच पूजा सचिन कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे वडार समाजातील सर्वच वयोगटातील लोकांनी संयोजकांचे आभार मानले. मोठ्या संख्येने शैक्षणिक क्रांती घडत असल्याचे या मेळाव्यात दिसून आले. माधुरी चव्हाण यांनी चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केले. त्यानंतर स्नेहभोजन आणि वधू वर तसेच पालकांचा परिचय चांगल्या पद्धतीने झाल्याने मेळावा यशस्वी झाल्याची पोच पावती मिळाली.





