ताज्या बातम्या

जी.के. एस. कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवलीमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

मुंबई (शांताराम गुडेकर ) : जी.के.एस. कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडावली येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा सौ. कविता शिकतोडे मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी.सागर सर तसेच ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री. शफिक शेख सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ.एस.जी. सागर सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.या कार्यक्रमाला इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारा सर्व शिक्षकवर्ग तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राध्यापिका कृतिका खांडगळे मॅडम आणि प्राध्यापिका सौ. मोहिनी शेलार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमा दरम्यान इयत्ता अकरावीतील विद्यार्थीनी कु. आरती पवार, कु. रितिका मोरे आणि कु. संदेश कोकरे यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करून त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैष्णवी पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. त्यांच्या सुंदर निवेदनामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे विचार आणि विद्यार्थ्यांचे मनोगत यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.शेवटी उपस्थित शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम जी. के. एस. कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडावली येथे उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

Scroll to Top