
मुंबई : Journalist Associationचा नियुक्ती सोहळा उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात नुकताच पार पडला. या सोहळ्यात १५ नव्या सदस्यांनी संघटनेत प्रवेश केला. नव्याने सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे National President ॲड. स्मिता चिपळूणकर यांनी मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकारांच्या विविध समस्या, हक्क आणि हिताच्या प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पत्रकारांच्या न्याय्य मागण्या, हक्क आणि हितसंबंधांसाठी Journalist Association अधिक प्रभावीपणे कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, Journalist Associationच्या सदस्या अनिता शुक्ला यांची Mumbai Press Clubच्या Managing Committee Member म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. National President ॲड. स्मिता चिपळूणकर यांनी अनिता शुक्ला यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अनिता शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे Journalist Associationच्या सदस्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Journalist Associationचा विस्तार करून अधिकाधिक पत्रकारांना संघटनेशी जोडणे, त्यांच्या समस्या शासन व संबंधित यंत्रणांपर्यंत प्रभावीपणे मांडणे आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देणे, या उद्देशाने आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
१५ नव्या सदस्यांचा संघटनेत प्रवेश आणि अनिता शुक्ला यांची Mumbai Press Clubच्या व्यवस्थापन समितीवर झालेली नियुक्ती यामुळे Journalist Associationचा हा नियुक्ती सोहळा विशेष ठरला.




