सातारा(अजित जगताप): सर्वसामान्य रुग्णांना साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात योग्य उपचार व्हावा. यासाठी सातत्याने स्थानिक वृत्तवाहिनीद्वारे आवाज उठवणारे पत्रकार सचिन मदने यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार होत आहेत. शासकीय रुग्णालयातील सिव्हिल सर्जन डॉ. राहुल जाधव यांच्या तत्परतेने सध्या पत्रकार श्री मदने यांच्यावर योग्य उपचार सुरू झाले आहेत. याबाबत साताऱ्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाचे माणुसकी भावनेतून भेट घेऊन सातारचे सिव्हिल सर्जन डॉक्टर जाधव यांना पत्रकार श्री मदने यांच्यावर चांगले उपचार व्हावे अशी विनंती केली होती. याबाबत माहिती अशी की, सामाजिक जाणीव ठेवून साताऱ्यात वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पत्रकारिता करणारे काही पत्रकार आहेत. अनेकदा शासकीय रुग्णालयातील अनेक विधायक उपक्रम व नवीन यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर त्याची माहिती उपचारासाठी आलेल्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटत होते. यामध्ये वृत्तवाहिनीचे पत्रकार सचिन मदने आघाडीवर होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालवल्यामुळे वृत्तवाहिनीचे पत्रकार स्वप्निल गव्हाळे यांनी त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय सातारा या ठिकाणी रात्री आठ वाजता उपचारासाठी दाखल केले होते. त्या ठिकाणी त्यांना तातडीने रक्ताचा पुरवठा करण्याची गरज निर्माण झाली होती. याबाबत हेडसांड होऊ नये. याची काळजी घेण्यासाठी साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, विनीत जवळकर, संदीप राक्षे आणि ज्ञानेश्वर भोईटे यांनी तातडीने क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात धाव घेतली व श्री मदने यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच शासकीय रुग्णालयातील सिव्हिल सर्जन डॉ. राहुल जाधव यांची भेट घेतली.
पत्रकार श्री. मदने यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार व्हावा व त्यांच्यावर विशेष लक्ष द्यावे. यासाठी तातडीने सिव्हिल सर्जन यांनी वैद्यकीय अधिकारी व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सूचना केली. सर्वच रुग्णांची काळजी घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात चांगल्या पद्धतीने सुधारणा झालेली आहे. त्यामुळे अनेकांना शासकीय रुग्णालयाचा दिलासा मिळाला आहे. काही गोष्टींचा अपवाद वगळता शासकीय रुग्णालयामध्ये अत्यावश्यक सेवा अधिक जलद गतीने देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. रिक्त पदे तातडीने भरावी यासाठी विशेष भरती मोहीम पुन्हा एकदा राबवण्याची सूचनाही काहींनी केली आहे. ……..,…………………..
फोटो — साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात पत्रकार सचिन मदने विचारपूस करताना मान्यवर.. (छाया- निनाद जगताप, सातारा)




