नवी मुंबई : सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था आणि महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व फिजिओथेरपी कन्सल्टेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
कोपरखैरणे येथील शारदा विद्या मंदिर स्कूल, सेक्टर-८ येथे हे शिबिर होणार आहे. शिबिरात डॉ. स्नेहा संकपाळ (PT), Consultant Physiotherapist, BPT, CDCT, ANC, PNC, Women’s Health Expert, MIAP Reg-L60408 आणि डॉ. प्रशांत मोरे (PT), Consultant Physiotherapist, BPT, MPT (Sports Science), Faculty, MGM Institute of Health Science, MIAP Reg-L59475 हे मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत.
EVAA Physio – ईव्हा अॅडव्हान्स फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन क्लिनिक यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, स्ट्रोक, पार्किन्सन, स्पाइनल कॉर्ड इजा, लिगामेंट टिअर्स, मोच, खेळाडूंच्या दुखापती तसेच ऑपरेशननंतरची फिजिओथेरपी व रिकव्हरी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला दिला जाणार आहे.
याशिवाय मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फिजिओथेरपी, जुनाट वेदना कमी करण्यासाठी उपचार व मार्गदर्शन तसेच प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात व्यायाम आणि स्तनपानाबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : शारदा विद्या मंदिर स्कूल, सेक्टर-८, कोपरखैरणे, नवी मुंबई
दिनांक : शनिवार, १५ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ९ ते दुपारी १
संपर्क :
रमेश संकपाळ (सर) – 9967754544
पांडुरंगशेठ वाळणेकर – 9323228309
अंकुश संकपाळ – 9967750960
ऋषिकेश संकपाळ – 7039918939
राजेंद्र मोरे – 9702827200
गौरव संकपाळ – 8652666364
विष्णु शिंदे (सर) – 9702819493
सुयश संकपाळ – 9867726105 अधिक माहिती साठी यांच्याशी संपर्क साधावा.




