ताज्या बातम्या

हौसाई विद्यालयात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

मलकापूर : हौसाई विद्यालय, मलकापूर येथे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यालयातील शिक्षक तसेच समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सुमारे २५ हजार रुपयांचे शालेय गणवेश विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.

यावेळी कराड मर्चंट पतसंस्था, शाखा शास्त्रीनगरचे शाखाधिकारी रामचंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “समाजात अनेक हुशार व होतकरू विद्यार्थी आहेत. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण घेताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून समाजाचा आदर्श घटक बनविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”

समाजातील दानशूर व्यक्ती विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करत असून, अशा उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळतो, असेही पवार यांनी सांगितले.

हौसाई विद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार देण्यावर भर दिला जातो. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून आजच्या स्पर्धात्मक युगात सक्षमपणे टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य विद्यालयात केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी यांनी केले. यावेळी बाबाजी पाटील पतसंस्थेचे संचालक अवधूत पाटील, मुल्ला साहेब, नायकवडी सर, सूर्यकांत जाधव यांच्यासह प्राचार्य सतीश कुमार सावळकर, पद्मावती पाटील, अंजली जानुगडे, ऋषिकेश पोटे, प्रकाश बाबर, चव्हाण सर, किरण कुंभार, विकास शिंगाडे, सुधाकर कांबळे, महेंद्र अंबवडे, पाटील मॅडम, पवार मॅडम आदी मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Scroll to Top