ताज्या बातम्या

आदिवासी दिनानिमित्त साताऱ्यातील जोर येथे संस्कृतीचे दर्शन…

वाई(अजित जगताप) : भारत देशाच्या संस्कृतीचा उगम हा मूलनिवासी व आदिवासी समाजाने जतन करून ठेवले आहे. त्यामुळे संस्कृतीला पालवी फुटली. वाई तालुक्यातील जोर येथील आदिवासी पाड्यावर समाज बांधवांनी आदिवासी दिन साजरा करून संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.
आपल्या उपजीविकेसाठी पश्चिम महाराष्ट्र मध्ये अनेक खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी समाज विखुरलेला आहे. परिश्रम कष्ट आणि स्थानिक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. त्याचबरोबर आदिवासी संस्कृती ही जतन केली आहे. आदिवासी दिनानिमित्त खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिना सारखेच सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणून नववा पिढीला प्रेरणा दिलेले आहे. आदिवासी समाज हा विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहिलेला आहे. कोट्यावधी रुपयाच्या
विकास कामाची जाहिरात बाजी होते. पण त्यातील पाच टक्के रक्कम सुद्धा आदिवासी पाडे पर्यंत पोहोचत नाही. कोणतेही सरकार असले तरी आदिवासी हा आदिवासीच राहतो. याचा अनुभव आलेला आहे. अशी खंत सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

जोर तालुका वाई येथे साजरा झालेल्या आदिवासी दिनानिमित्त इतर समाजाने सहभाग घेतला. त्यावेळी आदिवासी

समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडले. आदिवासी समाज पेहरावा व गीत सादर करण्यात आले. समृद्ध संस्कृती, परंपरा, अस्मिता तसेच सामाजिक योगदानाबाबत जागृती करण्यात आली. अंधश्रद्धा व अज्ञानापासून आदिवासी समाजाला बाहेर येण्याची संधी प्राप्त करणे म्हणजे खऱ्या अर्थाने आदिवासीच्या विकास होणे होय.
जोर तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी कोळी महादेव मित्र मंडळ, आदिवासी पाडा यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम झाले. आदिवासी परंपरा सोबतच विज्ञान युगाच ओळख नवीन पिढीला करून देण्याचा संकल्प करण्यात आला. आदिवासी व जंगली प्राणी यांचे अतूट नाते होते. आता नागरीकरणामुळे संघर्ष सुरू झाल्याची काहींनी भावना व्यक्त केली .

याप्रसंगी जोर परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते संदिप सपकाळ, अनिल धानवले, किसन सपकाळ, समिर यादव, संतोष यादव, अविनाश यादव, गणेश यादव, किरण यादव, सखाराम यादव, राम कदम, विनोद यादव, शिवाजी यादव, निलेश यादव यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

—————————————————

चौकट- आदिवासी युगपुरुष भगवान बिरला मुंडा, मुर्मू, बिला यांचेही स्मरण करण्यात आले तसेच त्यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
————————
फोटो : जोर (ता. वाई) य आदिवासी पाड्यावर जागतिक आदिवासी दिनानिमित्त सहभागी आदिवासी (छाया- निनाद जगताप, जोर)

Scroll to Top