ताज्या बातम्या

अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकारांसाठी राज्यस्तरीय लेख स्पर्धा

मुंबई : मराठी भाषेला मिळालेला ‘अभिजात भाषा’ दर्जा हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे. या समृद्ध भाषेची परंपरा जपत तिचा प्रभावी वापर समाजजीवनात अधिक व्यापक व्हावा आणि पत्रकारितेत सकारात्मक, विधायक दृष्टिकोनाला चालना मिळावी, या उद्देशाने मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त मराठी पत्रकारांसाठी राज्यस्तरीय लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या सामाजिक प्रश्नांकडे केवळ समस्या म्हणून न पाहता, त्यावर पत्रकार म्हणून कोणते सकारात्मक उपाय सुचविता येतील, हा विचार या स्पर्धेच्या केंद्रस्थानी आहे. ‘समस्या काय आहे?’ याबरोबरच ‘पत्रकार म्हणून त्या समस्येच्या निराकरणासाठी आपण काय करू शकतो?’ या दृष्टिकोनातून लेखन करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. देशभरातील मराठी पत्रकारांच्या कल्पक विचारांना, अनुभवांना आणि विधायक भूमिकेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
पारितोषिके
प्रथम पारितोषिक : रु. १५,५५५ व सन्मानचिन्ह
द्वितीय पारितोषिक : रु. ११,१११ व सन्मानचिन्ह
तृतीय पारितोषिक : रु. ५,५५५ व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ दोन पारितोषिके : प्रत्येकी रु. १,१११ व प्रमाणपत्र
स्पर्धेचे विषय
ज्ञानेश्वरी ते ट्विटर : मराठीचा अभिजात वारसा, प्रवास आणि भविष्य
मराठी पत्रकारिता आणि भाषा शुद्धी : आजच्या हेडलाईनमध्ये मराठी कुठे हरवतेय?
एआय, रील्स आणि मराठी : डिजिटल युगात अभिजात मराठी भाषा कशी टिकवणार?
अभिजात भाषा आणि बोलीभाषा : वर्‍हाडी, मालवणी, खानदेशी आदी बोलीभाषांना मराठीच्या अभिजात दर्जाचा फायदा होणार का?
भाषा गेली तर राष्ट्र जाते : अभिजात दर्जा हा सन्मान आहे की जबाबदारी?
बंद मराठी शाळा आणि अभिजात दर्जा : चुकते आहे कुणाचे… पालक की सरकारचे?
महत्त्वाच्या सूचना
लेखामध्ये केवळ समस्या मांडणे अपेक्षित नसून, पत्रकार म्हणून त्या समस्येच्या निराकरणासाठी कोणत्या ठोस उपाययोजना करता येतील, याबाबत स्पष्ट भूमिका आणि सूचना मांडणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी कोणतेही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय बंधन नाही. देशभरातील मराठी भाषेत कार्यरत पत्रकार सहभागी होऊ शकतात.
शब्दमर्यादा : ८०० ते १००० शब्द
अंतिम मुदत : ५ सप्टेंबर २०२६
लेखाचे स्वरूप : PDF
लेख मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर PDF स्वरूपातच पाठवावा.
स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी स्पर्धा समन्वयक श्री. रजनीश राणे यांच्याशी मो. ९८२०३५५६१४ या क्रमांकावर अथवा mmps.president@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

Scroll to Top