सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ आज सामाजिक संघटना, व्यापारी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने शहर बंद आणि भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कुपवाड आणि सांगली येथे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक आणि सर्वपक्षीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी घरपट्टी वाढीचा निर्णय जनतेवर अन्यायकारक असल्याचे सांगत तो तात्काळ मागे घेण्याची जोरदार मागणी केली.
यावेळी मोर्चात सहभागी होत आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. वाढत्या महागाईच्या काळात घरपट्टीत प्रस्तावित वाढ केल्यास सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याने महानगरपालिकेने हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.




