ताज्या बातम्या

साहित्यसंपदा वर्धापनदिनानिमित्त सन २०२६ चे साहित्यिक आणि सामाजिक पुरस्कार जाहीर

मुंबई : मागील आठ वर्ष सातत्याने मराठी भाषा संवर्धन आणि भाषा प्रचार प्रसार साठी झटणाऱ्या साहित्यसंपदाचा वर्धापन दिन लवकरच चिंचवड पुणे येथे पार पडणार असून त्या निमित्ताने साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांनी समाजात आपली विशेष छाप सोडणाऱ्या साहित्यसंपदा प्रकाशनाच्या पुस्तकांना आणि समाजात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती ,संस्था यांना पुरस्कार जाहीर केले.

कै. सौ. मखमल श्रीरंग सोनवणे स्मरणार्थ उत्कृष्ठ कथा लेखन पारितोषिक ‘तो आलाय ‘ कथासंग्रह – श्री. किरण बोरकर कै. श्रीरंग रामचंद्र सोनवणे
स्मरणार्थ उत्कृष्ठ मुखपृष्ठ पारितोषिक ‘आता जाऊया सूर्यावर’ मुखपृष्ठकार : मनोमय मीडिया, कै. सौ. प्रतिभा विनायक शेरखाने
स्मरणार्थ उत्कृष्ठ काव्यसंग्रह ‘ही माती माझ्या यात्रेची विठाई ‘श्री. चारुदत्त चिखले याना जाहीर झाले.कै.सुरेंद्र बालंखे लक्षणीय लेख संग्रह २०२६ पुरस्कार
‘शब्द दरवळ’ या श्री. सुनील चिटणीस यांच्या लेख संग्रहास जाहीर झाला.कै.गौरव अनिल नानोटी स्मृती प्रित्यर्थ लक्षणीय बालकथा संग्रह पुरस्कार २०२६
‘पिकलपोनि’ रमा जाधव आणि कै.गौरव अनिल नानोटी स्मृती प्रित्यर्थ लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार २०२६ ‘प्रतिभेच्या वाटेवर’ श्री. प्रथमेश कासार याना जाहीर झाला.सौ.नीलम सावंत पुरस्कृत उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार २०२६’नादखुळा’ या श्री. रमेश धनावडे आणि ‘दीपस्तंभ’ या सौ.करुणा पांचाळ या पुस्तकास जाहीर झाला.
कै.अनिल देशपांडे स्मृती प्रित्यर्थ काव्य प्रेरणा पुरस्कार २०२६ ‘कैवल्याचे डोही’ श्री. दिलीप मोकल आणि ‘जाणिवांच्या वाटा ‘ अस्मिता सावंत यांना जाहीर झाला.कै.मनीषा संजय पाटील स्मृती प्रित्यर्थ लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार २०२६ ‘सागरी किनारा’ सौ.भावना काळे आणि ‘हितगुज मनाचे मनाशी’
सौ.पल्लवी कोळी यांना जाहीर झाला.कै.मंजुषा प्रदीप कोरंगळेकर स्मृती प्रित्यर्थ लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार ‘शब्दोत्सव’सौ.सोनाली जगताप आणि कविता झुंजारराव लिखित ‘आता जाऊया सूर्यावर’ या बालकाव्यसंग्रहास याना जाहीर झाला.कै.कमलाबाई पाटील पुरस्काराच्या मानकरी मंजुळा म्हात्रे त्यांच्या ‘मंजुळाक्षरे’ पुस्तकासाठी ठरल्या.
साहित्यसंपदातर्फे समाजात बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा ,संस्थांचा सन्मान करण्यात येतो त्या अंतर्गत कै.डॉ अनुपमा दिलीप धनावडे स्मृती प्रित्यर्थ
साहित्यसंपदा मराठी दीपस्तंभ कोमसाप शाखा उरण याना लाभला आहे.तसेच साहित्यिक सामाजिक योगदानासाठी २०२६ शाळेचे पुरस्कार कै.डॉ अनुपमा दिलीप धनावडे स्मृती प्रित्यर्थ साहित्यसंपदा युवा प्रेरणा पुरस्कार श्री. निखिल कोलते कोषाध्यक्ष मनस्पर्शी साहित्य,कला व क्रीडा प्रतिष्ठान आणि
कै.डॉ अनुपमा दिलीप धनावडे स्मृती प्रित्यर्थ साहित्यसंपदा युवा प्रेरणा पुरस्कार श्री. प्रमोद सूर्यवंशी संपादक -आम्ही मुंबईकर यांना जाहीर झाले.

साहित्यसंपदातर्फे सातत्याने लिखाण करणाऱ्या काही जेष्ठ सदस्यांनाही ‘साहित्यसंपदा आधारवड’ सन्मान जाहीर झाला असून त्या अंतर्गत अमृता देखणे ,सीमा हरकरे ,शशिकांत पाटणकर ,छाया दीक्षित ,स्मिता पेशवे यांना जाहीर झाला.

सर्व पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह /सन्मानपत्र,शाल श्रीफळ असे असून जाहीर कार्यक्रमात यांचे वितरण कऱण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.

Scroll to Top