ताज्या बातम्या

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कामा रुग्णालय येथील ” टीम”च्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

मुंबई (शांताराम गुडेकर) : महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ जी शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री.मंगेश जी चिवटे व कार्याध्यक्ष श्री.रामहरी जी राऊत यांच्या सूचनेनुसार राज्य उपाध्यक्ष श्री.जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अकाली व अतिदक्ष बालकांसाठी गेल्या ३ वर्षांत १,२०० लिटर स्तनदूध संकलन करून ७००० हून अधिक नवजात बालकांचे प्राण वाचवले. त्यांनी दिलेले हे “जीवनदान” अमूल्य आहे.स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून कामा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.तुषार पालवे सर,आर.एम. ओ. डॉ.सुजाता जाधव,मिल्क बँक सिस्टर इन्चार्ज धनश्री जगताप,असिस्टंट मॅटरन निरुपमा डोंगरे,पी एन सी वॉर्ड इन्चार्ज अंजली कोलते यांचा आज सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच पाच “स्तनदुग्ध माता” यांचा श्रीफळ व साडी चोळी देऊन ओटी भरण्यात आली.यावेळी डॉ.पालवे सर यांनी दूधदान…. जीवनदान” हा संदेश दिला,.दुग्ध बँके बद्दल माहिती देताना कामा रुग्णालयातील उपलब्ध असलेल्या मोफत आई.व्ही.एफ. व कॅन्सर उपचारांबाबत माहिती दिली. याप्रसंगी मा.नगरसेविका सौ.वैशाली नविन शेवाळे, वैद्यकीय मदत कक्षाचे मुंबई सचिव डॉ.नवीन शेवाळे, दक्षिण मुंबई सचिव श्री.हितेश राणा, शिवडी विधानसभा प्रमुख सौ.गायत्री आंब्रे,मलबार हिल विधानसभा प्रमुख श्री.जयेश शिंपी, भारतीय केबल सेनेचे राष्ट्रीय सचिव श्री.राजेश जैन, श्री.दिनेश संकपाळ,सौ.स्नेहा मोहिते, श्री.सुदेश पांडे, श्री.ऋषिकांत उतेकर व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Scroll to Top