नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यास भारतीय रेल्वेने मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री यांचा आज नवी दिल्लीत शिवसेना पक्षाच्या वतीने तसेच कोकणवासीयांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे संसदीय गटनेते , खासदार , महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती , खासदार , खासदार तसेच खासदार उपस्थित होते.
सीएसएमटी–सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेस सुरू करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आता कोकण रेल्वे मार्गावर ही एक्सप्रेस नियमित धावणार आहे. या गाडीला मार्गावरील २२ स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे.
विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मुंबई व उपनगरांतून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांची प्रवासाची गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून, वर्षभर नियमित प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांनाही या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचे कोकणवासीयांकडून स्वागत करण्यात येत आहे.




