ताज्या बातम्या

लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई : थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच समाजपरिवर्तनाला चालना देणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून या दोन्ही महामानवांच्या प्रतिमेस उपमहापौर श्री.दशरथ भगत यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन करण्यात आले. मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे संपन्न प्रतिमापूजनप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Scroll to Top