ताज्या बातम्या

श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळ, मुलुंड (पूर्व) गुरूस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

मुंबई (शांताराम गुडेकर ) : भूत काळाचा दिवा आणि भविष्य काळाचा दाता तो गुरू तेअसं म्हटलं जातं म्हणूनचं मनाची भावना त्यांचे विचार यामध्ये बदल दिसला पाहिजे ईश्वरी धन पाहिजे असेल तर जे पेराल तेच दिसेल असे समर्थ सद्गुरु गुरुदास माऊली यांनी श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळ, मुलुंड (पूर्व) गुरूस्थान येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित उपस्थित भक्तांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी नित्यनैमित्तिक पूजा होऊन पुरोहित अमोल ऐमाईणकर यांच्या मंत्रोच्चारात अभिषेक श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज यांच्या मूर्तीवर करण्यात आला त्यांचा उपस्थित भक्तांनी लाभ घेतला. प. पू. सद्गुरु गुरुदास माउली म्हणाल्या की, आपल्या गुरूला अभिप्रेत काय असतं तर ते म्हणजे नामस्मरण त्यावर लक्ष केंद्रित केल्यास श्रद्धा आणि आध्यात्मिक संगम अनुभवायला मिळेल असे सूचित केले. याप्रसंगी कुर्ला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत, बापू मगदुम,सुनील माळगावकर, दाजी सावंत, सुनील मगदुम, प्रकाश कुंभार, मोरे आदींनी आपले अनुभव कथन करताना नमूद केले की, गुरूदास माऊली कडे आपला उध्दार करून घेण्याच्या प्रामाणिक हेतूने येतात त्यांना गुरुदास माऊलींचे योग्यप्रकारे मार्गदर्शन लाभल्याने त्यांची आत्मिक उन्नती करून दिली. गरीब, श्रीमंत असा भेदभाव केला नाही. पुरुष, प्राणिमात्र या सर्वांवर समदुष्टीनेच पाहण्यास असे नमूद केले. यावेळी सुस्वर भजन युवा बुवा नंदेश संगमेस्कर, भालचंद्र सारंग यांच्या नवीन रचनेत विविधता साधत भजन सादर केलीत त्याला पखवाजवादक वसंत घडशी , ढोलकीवादक संदेश संगमेस्कर , तन्वीर आंगणे यांची साथ लाभली त्यानें उपस्थित भक्तमंडळी मंत्रमुग्ध होऊन गेली. यावेळी भाविक भक्तांनी तिर्थप्रसादाचा आणि महाप्रसाद लाभ घेतला.

Scroll to Top