ताज्या बातम्या

लोअर परळ येथे श्री संत मोरे माऊली महाराज संस्थानचा गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

मुंबई( अंकुश महाराज कुमठेकर)

: मुंबईतील लोअर परळ येथे श्री संत मोरे माऊली महाराज संस्थानच्या वतीने श्री संत मोरे माऊली महाराज व परमपूज्य सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाचे यंदाही मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात आयोजन करण्यात आले. मुंबईतील शिष्य-भक्त परिवाराने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उत्सव अत्यंत थाटामाटात साजरा केला.
उत्सवानिमित्त श्री संत मोरे माऊली महाराज, श्री गणेश, श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच समाधीस्थळाचा अभिषेक श्री प्रमोद कदम व सौ. मंजू कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यानंतर गुरुपरंपरेतील अभंगांवर सार्वजनिक भजन, महाआरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
व्यासपूजन व सद्गुरु पाद्यपूजनाचा मान मुंबईतील नामांकित उद्योजक श्री राम रिंगे यांचे सुपुत्र श्री अनिकेत रिंगे व सौ. सायली रिंगे यांना लाभला. यावेळी परमपूज्य सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या प्रेरणादायी प्रवचनाने उपस्थित शिष्य व भाविक मंत्रमुग्ध झाले.
या सोहळ्यास वारकरी संप्रदायातील साधक, विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर तसेच असंख्य भाविकांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. महाप्रसादाची व्यवस्था श्री रामशेठ रिंगे यांच्या वतीने करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संप्रदायाचे सचिव ह.भ.प. लहू महाराज मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी, सेवेकरी व शिष्य परिवाराने परिश्रम घेतले.

Scroll to Top