ताज्या बातम्या

श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर (मुंबई ) येथे मित्र पक्ष ग्रुप आयोजित कलगी तुरा दोन नामांकित शाहिरांचा महामुकबला….

मुंबई, सौ.मनस्वी मणवे : आपल्या कोकनची लोककलेची म्हणजेच, कलगी तुरा ह्या लोककलेची परंपरा प्रामाणिकपणे जोपासायची धुरा नव्या युवा शाहीरांनी हाता मध्ये घेतलेली असुन, हे शाहीर गावोगावी आपली कला सादर करुन मुंबई च्या रंगमंच्यावर ही कला सादर करत आहेत. खरंच आपल्या आपल्या ह्या कलेचा आदर करुन सर्वांनी सहकार्य करावे.
सर्व रसिक मायबाप यांच्या आग्रहस्तव रविवार दि. ०२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ०७:३० वाजता एक प्रतिष्ठित असा, ग्रुप तो म्हणजे मित्र पक्ष ग्रुप यांनी दादर मधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर या हॉल येथे शक्तिवाले शाहीर सुशांत मणवे ( शाखा – श्री.आई महालक्ष्मी नृत्य कलापथक, मौजे असुर्डे, मणवेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी)तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर तेजस वीर (शाखा – मठवाडी नृत्य कलापथक रुण (मठवाडी), ता. लांजा, जि. रत्नागिरी ) या दोन नामांकित शाहीरांचा महामुकबला आयोजित केलेला आहे.चला तर सर्वांनी उपस्थित राहून ह्या दोन्ही शाहीरांचा कलगी तुरा सामना पाहूया.. कोण मारणार बाजी….!

Scroll to Top