ताज्या बातम्या

ज्येष्ठाना बेस्ट मध्ये सवलतीच्या दरात प्रवास होणार…. सुरेश पोटे (फेस्कॉन )

मुंबई(शांताराम गुडेकर ) : बृहन्मुंबई क्षेत्र व परिसरातील बेस्ट सेवा, ज्येष्ठा करिता विनामूल्य अथवा सवलतीच्या दरात प्रवास सुरु करण्या बाबत, फेस्कॉन च्या वतीने, म न पा नियोजन विभाग यांना प्रस्ताव सदर केला, त्याला अनुसरून, सवलतीच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी रु.१ कोटी ची तरतूद बेस्ट कडून झाली आहे व लवकरच ज्येष्ठाना सवलतीच्या दरात प्रवास सुरु होईल. तसेच ज्येष्ठा साठी आरोग्य, विमा, शिबीरे, हॉस्पिटल, आयोजित करण्यासाठी साठी पाठपुरावा चालू असल्याचे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉन )मुंबई प्रादेशिक विभाग चे अध्यक्ष – सुरेश पोटे यांनी ज्येष्ठाना मार्गदर्शन करताना सांगितले.
विसावा ज्येष्ठ नागरिक संघ यांनी आयोजित केलेल्या मासिक वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुंबई प्रादेशिक विभाग अध्यक्ष – सुरेश पोटे, मुंबई ज्येष्ठ नागरिक संघांचे सदस्य – दिलीप धारकर, संकल्प ज्येष्ठ नागरिक संघांचे उपाध्यक्ष – शांताराम खामकर, विसावा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष – हिदुराव वाडते, सोनू वारंग, बाळकृष्ण हळदणकर व पत्रकार – बाळ पंडित, व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विजय केसरकर व परेश कोलले यांच्या भावगीताने व भक्ती गीताने झाली. उपस्थित २० ज्येष्ठाना मान्यवरच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.सूत्रसंचालन मंगेश पाटनाईक यांनी केले व हिंदुराव वाडते यांनी आभार मानले. पदाधिकारी – रमेश शेलार, रोहिदास बुद्धिवंत,आप्पासाहेब पाटील, शैलजा बोन्द्रे, चंद्रज्योती कांबळे व बबन बोले यांनी फारच मेहनत घेतली होती.

Scroll to Top