ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

पंढरपूर कराड रोडवर भीषण अपघात….

प्रतिनिधी : पंढरपूरमध्ये भीषण अपघात झाल्याच समोर आलेय. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली. पंढरपूर -कराड रोडवरील कटफळ येथे हा भीषण अपघात झालाय. यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला शिफ्ट कऱण्यात आलेय.  दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आले आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ  येथील रहिवासी आहेत. या महिला मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर गेल्या होत्या.  काम संपल्यानंतर दुपारी घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर – कराड रोडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले. आज दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला. आयशर ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या सातही महिलांना चिरडले. या सर्व महीला या कटफळ येथील रहिवासी आहेत. 

Scroll to Top