ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; विविध ठिकाणी सन्मान

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्याचे सुपुत्र तसेच शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख, तरुण उद्योजक आणि समाजसेवक बालाजी उद्धव बागल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले, तसेच अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने बालाजी बागल यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच मुंबई येथील श्रीसंत मोरे माऊली स्वर साधना हरिपाठ मंडळ, घाटकोपर यांच्या वतीनेही त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा अर्पण करण्यात आल्या. त्यांच्या असंख्य मित्रपरिवार, सहकारी व हितचिंतकांनी एकत्र येत वाढदिवस साजरा केला.
यावेळी उपस्थितांनी संतवचनांचा उल्लेख करत, “अकल्प आयुष्य व्हावे तया कुळात माझी या सकळा हरीच्या दासा” या भावनेतून त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य लाभावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

Scroll to Top