ताज्या बातम्या

मंगेश चिवटे यांची ‘ऑल इंडिया एअरपोर्टस् एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन’च्या राष्ट्रीय सचिव व राष्ट्रीय सल्लागार पदी नियुक्ती

मुंबई: शिवसेना पुरस्कृत ‘ऑल इंडिया एअरपोर्टस् एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन’ (AIAAEU) च्या राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय सल्लागार पदी श्री. मंगेशजी चिवटे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. युनियनचे सरचिटणीस कुणाल रवींद्र सरमळकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली.
संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक व सल्लागार, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. श्री. उदय सामंत आणि युनियनचे अध्यक्ष व शिवसेना आमदार मा. श्री. मुरजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी अभिनेते दिगंबर नाईक देखील उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध:
युनियनचे सरचिटणीस कुणाल सरमळकर यांनी पत्रात विश्वास व्यक्त केला आहे की, संघटनेच्या संविधान, नियम आणि धोरणांनुसार श्री. चिवटे हे आपल्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडतील, तसेच विमानतळ कर्मचारी व सदस्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहतील.
ही नियुक्ती संघटनेच्या पुढील निवडणुकीपर्यंत, कार्यकारिणीच्या पुनर्रचनेपर्यंत किंवा संघटनेच्या पुढील आदेशापर्यंत वैध राहणार आहे. या निवडीबद्दल मंगेश चिवटे यांच्यावर राजकीय व विमानतळ कर्मचारी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी युनियनतर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Scroll to Top