मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज विधानभवनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन सदिच्छा भेट घेतली. कर्नाटक–महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीची बैठक संपल्यानंतर झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनात पवार यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात संवाद झाला. राजकीय मतभेद असले तरी राज्यहिताच्या विषयांवर संवाद आणि समन्वय कायम ठेवण्याच्या परंपरेचा प्रत्यय या भेटीतून आला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याप्रती आदर व्यक्त करत त्यांचे स्वागत केले, तर या सदिच्छा भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.




