मुंबई : महाराष्ट्र लोकभवनच्या पुढाकाराने व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान अंतर्गत आज कचरा वेचक महिलांसाठी फाईन आर्ट सोसायटी चेंबूर मुंबई येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व ‘नमस्ते’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल तसेच अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते कचरा वेचक महिलांना ‘आयुष्यमान कार्ड’ व आरोग्य रक्षणासाठी पीपीई किट देण्यात आले.
कार्यक्रमाला कचरा वेचक महिलांच्या उत्थानासाठी कार्य करीत असलेल्या सुशीला साबळे, नगर सेविका व प्रभाग समितीच्या अध्यक्षा आशा मराठे, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा, ज्योती म्हापसेकर, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थानं) डॉ किरण दिघावकर व देवनार परिसरातील कचरा वेचक महिला आदी उपस्थित होते.





